Closing Bell | बाजारात सलग पाचव्या सत्रांत तेजी, सेन्सेक्स ३८५ अंकांनी वाढून बंद, ‘हे’ शेअर्स वधारले

Closing Bell | बाजारात सलग पाचव्या सत्रांत तेजी, सेन्सेक्स ३८५ अंकांनी वाढून बंद, ‘हे’ शेअर्स वधारले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज गुरुवारी सलग पाचव्या सत्रांत तेजी कायम राहिली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex Today) ४०० अंकांनी वाढून ६६,२८९ वर पोहोचला. त्यानंतर तो ३८५ अंकांच्या वाढीसह ६६,२६५ वर स्थिरावला. तर निफ्टी ११६ अंकांनी वाढून १९,७२७ वर बंद झाला. क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी आणि फार्मा वगळता बँक, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, पॉवर आणि रियल्टी १ ते २ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला. रियल्टी आणि सरकारी बँकांमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. (Stock Market Closing Bell)

जागतिक बाजारातील कमकुवत स्थिती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात किरकोळ घसरणीसह झाली होती. त्यानंतर दोन्ही निर्देशांक वधारले.

एलटीचा शेअर ठरला टॉप गेनर

सेन्सेक्स आज ६५,८५४ रुपयांवर खुला झाला होता. सेन्सेक्सवर एलटी (Larsen and Toubro) चा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ४ टक्के वाढून २,८४५ रुपयांवर पोहोचला. त्यासोबतच टेक महिंद्रा, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, एसबीआय, एनटीपी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. एचडीएफसी बँक, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स या शेअर्सनीदेखील आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर सन फार्मा, एम अँड एम, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले.

हल्दीराम हिस्सेदारी खरेदीच्या वृत्तादरम्यान टाटा कंझ्युमरमध्ये घसरण

बीएसईवर गुरुवारच्या व्यवहारात टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचे शेअर्स (Tata Consumer Products Share Price) ३ टक्क्यांनी घसरून ८५३.८ रुपयांवर आले. टाटाने भारतीय फूड स्नॅक चेन हल्दीराम्समधील (Haldiram) हिस्सेदारी विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण कंपनीने या वृत्ताचे खंडन केले आहे. बुधवारी (दि. ६ सप्टेंबर) रॉयटर्स वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने हल्दीराम कडून किमान ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी चर्चा केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारच्या सत्रात टाटा कंझ्युमरचा शेअर सुमारे ४ टक्क्यांनी वाढला होता.

झोमॅटोची १०० रुपयांवर चाल

काउंटरवर ब्लॉक डील झाल्याच्या वृत्तादरम्यान फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato shares) चे शेअर्स बीएसईवर गुरुवारच्या ट्रेडमध्ये ३ टक्के वाढून १०१ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर हा शेअर १०० रुपयांवर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

चीनमधील चिंतेमुळे आशियाई बाजारांचा मूड बिघडला

आशियाई आणि युरोपीय बाजारात आज घसरण दिसून आली. चीनमधील कमकुवत आर्थिक स्थितीचे पडसाद आशियाई बाजारात दिसून येत आहेत. जपानमधील बाजारातील आठ दिवसांतील तेजीला आज ब्रेक लागला. जपानचा निक्केई निर्देशांक ०.७५ टक्के घसरून ३२,९९१ वर स्थिरावला. सकाळच्या सत्रात हा शेअर ३३,३२२ वर गेला होता. टॉपिक्स निर्देशांकाने सकाळी २,३९७ अंकांवर जात 33 वर्षांचा उच्चांक गाठला होता. पण हा निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरून २,३८३वर बंद झाला.

हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news