चेन्नई ; वृत्तसंस्था : पंधरा वर्षांची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये फर्स्ट सॅटरडे ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेदरम्यान भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर बनली. तिने दुसरा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म आणि शेवटचा महिला ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला.
तिला आगामी स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे दिव्याने ट्विट करत सांगितले. दिव्याने नऊ फेरीत पाच गुणांची कमाई केली आणि 2452 रेटिंग गुण मिळवले. आता ती आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यापासून केवळ एक नॉर्म दूर आहे.