भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आयर्लंड संघाची घोषणा

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आयर्लंड संघाची घोषणा
Published on
Updated on

डब्लिन ; वृत्तसंस्था : भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार्‍या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी 14 सदस्यीय आयर्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेत स्टीफन डोहेनी आणि कोनोर ऑल्फर्ट हे दोन खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता आहे. या दोघांचाही 14 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे. डोहेनी फलंदाज तर ऑल्फर्ट वेगवान गोलंदाज आहे. 23 वर्षांच्या डोहेनीने टी-20 ट्रॉफी स्पर्धेत 52.67 च्या सरासरीने 74 धावा केल्या आहेत.

याचबरोबर त्याने विभागीय स्तरावर वन-डे सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. तर 2020 मध्ये 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या ऑल्फर्टने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत आयर्लंडच्या संघात स्थान मिळवले. तो 2021 मध्ये आयर्लंडने केलेल्या युएई दौर्‍यात देखील नेट बॉलर म्हणून संघासोबत होता.

त्याने विभागीय टी-20 ट्रॉफी स्पर्धेत 19.17 च्या सरासरीने 6 तर वन-डे क्रिकेटमध्ये 6 विकेटस् घेतल्या आहेत. भारताबरोबर 26 आणि 28 जूनला होणार्‍या दोन टी-20 सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व अँड्र्यू बालबर्नी करणार आहे. या संघात माक्र अडायर, पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू मॅकब्राईन यांचादेखील समावेश आहे.

आयर्लंडचा संघ : अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जॉश लिटिल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅकार्थी, कॉनर ऑफ्लर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news