Bronson Reed Pssed Away: WWE सुपरस्टार ब्रॉन्सन रीड काळाच्या पडद्याआड; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WWEचा लोकप्रिय ऑस्ट्रेलियन कुस्तीपटू ब्रॉन्सन रीड यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले.
Bronson Reed Pssed Away
Bronson Reed Pssed AwayPudhari
Published on: 
Updated on: 

WWE चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. लोकप्रिय ऑस्ट्रेलियन कुस्तीपटू ब्रॉन्सन रीड यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे खरे नाव जर्मेन हेली होते. काही आठवड्यांपूर्वीच ते WWEच्या क्राउन ज्वेल स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेदरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

ब्रॉन्सन रीड यांच्या निधनाची माहिती देताना WWE ने दुःख व्यक्त केले. ते केवळ एक दमदार कुस्तीपटू नव्हते, तर मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि कुटुंबावर प्रेम करणारे व्यक्ती होते, अशा शब्दांत WWE ने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रपरिवाराप्रती आणि चाहत्यांप्रतीही WWE ने संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात गर्भवती पत्नी पेज आणि एक मुलगी असा परिवार आहे.

क्राउन ज्वेल स्पर्धेदरम्यान गंभीर दुखापत

ब्रॉन्सन रीड यांना ७ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियात झालेल्या क्राउन ज्वेल स्पर्धेदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. 'फाईटफुल सिलेक्ट'च्या वृत्तानुसार, दुखापतीनंतरही रीड सौदी अरेबियातच होते. त्यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर आणि फुफ्फुसाला छिद्र पडले होते.

Bronson Reed Pssed Away
Layoffs 2026: IT क्षेत्रात बेरोजगारीचं नवं संकट; १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, कोणत्या कंपनीने घेतला निर्णय?

उपचारांसाठी WWE कडून विशेष व्यवस्था

रीड यांना दुखापत झाल्यानंतर WWE च्या वैद्यकीय पथकाने सौदी अरेबियातच थांबून त्यांना मदत केल्याचे 'फाईटफुल सिलेक्ट'ने म्हटले होते. WWE मधील एका वरिष्ठ आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यानेही त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवले होते. त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

क्राउन ज्वेल स्पर्धेतील घटनेनंतर रीड यांच्या प्रकृतीबाबत कुस्ती क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, WWE ने त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृतपणे सविस्तर माहिती दिली नव्हती.

Bronson Reed Pssed Away
Gold Silver Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! सोन्याचे दर पुन्हा वाढले; चांदीनेही गाठला नवा टप्पा, काय आहे आजचा भाव?

दुखापतीनंतर पुन्हा केले होते कमबॅक

ब्रॉन्सन रीड यांना यापूर्वीही दुखापतीमुळे काही काळ कुस्तीपासून दूर राहावे लागले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या हाताच्या स्नायूला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना अनेक महिने रिंगपासून दूर राहावे लागले. सप्टेंबरमध्ये त्यांनी पुन्हा WWE मध्ये पुनरागमन केले होते. या काळात त्यांनी आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष दिले होते. मात्र वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यांच्या निधनाने WWE चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.