Women's ODI World Cup : द. आफ्रिकेने इंग्लंडला चिरडले, १२५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक

South Africa in World Cup Final : द. अफ्रिका संघ पहिल्यांच फायनलमध्ये
Women's ODI World Cup : द. आफ्रिकेने इंग्लंडला चिरडले, १२५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक
Published on
Updated on

Women's ODI World Cup : द. आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान निश्चित केले आहे. बुधवारी (दि. २९) झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, कर्णधार लॉरा वोलवार्ड्टच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने निर्धारित ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३१९ धावांचा डोंगर उभा केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ ४२.३ षटकांत १९४ धावांतच गारद झाला. या विजयात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. मारिजन कॅप हिने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले, तर नादिन डी क्लार्कने दोन गडी बाद केले. याव्यतिरिक्त आयबोंगा खाका, म्लाबा आणि सुने लूस यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Women's ODI World Cup : द. आफ्रिकेने इंग्लंडला चिरडले, १२५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक
SA vs ENG World Cup 1st Semifinal : द. आफ्रिकेचा ‘रनवर्षाव’! लॉराच्या तडाख्यात इंग्लंड भुईसपाट

लॉरा वोलवार्ड्टची 'कॅप्टन्स इनिंग', १६९ धावांची अविस्मरणीय खेळी

उपांत्य फेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्ट हिने एका बाजूने किल्ला लढवत १४३ चेंडूंत २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६९ धावांची मोठी आणि महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

वोलवार्ड्टने सलामीला तैजमिन ब्रिट्ससोबत ११६ धावांची शानदार भागीदारी केली. ब्रिट्सने या सामन्यात ४५ धावांचे योगदान दिले. पहिली विकेट पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव काहीसा लडखडताना दिसला. एका वेळी आफ्रिकेने २०२ धावांच्या धावसंख्येवर आपले ६ गडी गमावले होते. अशा संकटजन्य परिस्थितीत कर्णधार लॉरा वोलवार्ड्टची खेळी संकटमोचकाप्रमाणे संघाला सावरत राहिली. तिच्या या खेळीमुळेच दक्षिण आफ्रिकेने केवळ मोठी धावसंख्या उभारली नाही, तर क्रिकेटप्रेमींना ही खेळी दीर्घकाळ स्मृतीत राहील. वोलवार्ड्ट ४८ व्या षटकात बाद झाली.

Women's ODI World Cup : द. आफ्रिकेने इंग्लंडला चिरडले, १२५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक
World Cup Semifainal: भारतीय संघावर मोठे संकट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल न खेळताच आव्हान संपुष्टात येणार? जाणून घ्या कारण

इंग्लंडकडून गोलंदाजीत सोफी एक्लेस्टोन सर्वात यशस्वी ठरली. तिने १० षटकांत ४४ धावा देत ४ बळी मिळवले, तर लॉरेन बेलला दोन विकेट्स मिळाल्या.

इंग्लंडची अत्यंत निराशाजनक सुरुवात

३२० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला इंग्लंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. संघाचे पहिले तीन फलंदाज या सामन्यात शून्यावर बाद झाले. अशाप्रकारे शून्यावर दोन, तर एका धावसंख्येवर तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. इथून संघाचे पुनरागमन अत्यंत कठीण राहिले.

परंतु, चौथ्या विकेटसाठी नॅट सीव्हर ब्रंट आणि एलिस कॅप्सी यांनी १०७ धावांची महत्त्वाची भागीदारी करत थोड्या आशा पल्लवित केल्या. मात्र, कॅप्सी आणि ब्रंट दोघीही अर्धशतक पूर्ण करून बाद झाल्यावर इंग्लंडचा संघ लवकरच संपुष्टात आला. कॅप्सीने ५० धावा केल्या, तर नॅट सीव्हर ब्रंटने ६४ धावा काढून आपली विकेट गमावली.

Women's ODI World Cup : द. आफ्रिकेने इंग्लंडला चिरडले, १२५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक
Rohit Sharma ODI No.1 : हिटमॅन रोहितचा ICC क्रमवारीत धमाका, 38व्या वर्षी बनला ‘वनडे’चा ‘सम्राट’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news