Womens Aisa Cup 2026 Trophy Row: भारतानं ट्रॉफी नाकारणं पथ्थ्यावर पडणार... झुकेगा नही! म्हणत नक्वी पाकिस्तानात 'पुष्पा' होणार?

Womens Aisa Cup 2026 Trophy Row
Womens Aisa Cup 2026 Trophy Rowpudhari
Published on
Updated on

Womens Aisa Cup 2026 Trophy Row: महिला एशिया कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत एशिया कप पुन्हा एकदा आपल्या नावावर केला. मात्र सामना झाल्यानंतर क्रिकेट संपलं अन् राजकारण सुरू झालं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पुन्हा एकदा एशियन क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी भारताला ट्रॉफी देणार होते. मात्र पुन्हा एकदा भारताने त्यांच्या हातून ट्रॉफी स्विकारणं नाकारलं. विशेष म्हणजे पाकिस्तान फायनलमध्ये नसताना देखील भारताने नक्वींच्या हातून ट्रॉफी स्विकारणे नाकारले. पुन्हा एकदा मोहसिन नक्वी चर्चेत आले.

Womens Aisa Cup 2026 Trophy Row
Asia Cup final : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडला दंड; पाकिस्तानलाही संथ षटकांचा फटका

विशेष म्हणजे मोहसिन नक्वी हे जरी सध्या एसीसीचे अध्यक्ष असले, तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन असले तरी ते पाकिस्तानचा गृहमंत्री देखील आहेत. म्हणजे भारतीय संघाने ज्यांच्या हातून ट्रॉफी घेणं नाकारलं. ते फक्त क्रिकेट प्रशासक नाही तर ते पाकिस्तान सरकारमधील एक महत्वाचा चेहरा देखील आहे.

Womens Aisa Cup 2026 Trophy Row
Asia Cup Trophy Controversy : "त्यांच्याकडून ट्रॉफी नकोच!" ; भारताने नक्वींना का नाकारलं? BCCI च्‍या सैकियांचा मोठा खुलासा!

पाकिस्तानमध्ये नक्वींचा दबदबा?

मोहसिन नक्वी हे पाकिस्तानमधील एक शक्तीशाली राजकीय व्यक्ती मानले जातात. ते फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या जवळच्या सर्कलमधील राजकारणी आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च सर्कलमध्ये त्यांची पोहोच असल्याने त्यांचा प्रभाव चांगला आहे. मात्र जरी ते सत्ताकेंद्राचा जवळचे असले तरी त्यांचे जनमानसातील स्थान याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नक्वी यांच्या कार्यकाळावरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. संघाची कामगिरी आणि खेळाडूंच्या निवडीवरून वाद यामुळं पीसीबी कायम चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावेळी देखील पीसीबीने अनेक खेळाडू, प्रशिक्षकांना मालिका सुरू असताना डच्चू दिला होता.

यामुळं नक्वी यांच्या कार्यशैलीवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीसीबी चेअमन म्हणून नक्वी हे अत्यंत वादग्रस्त राहिले आहेत. क्रिकेटच्या मैदानातच ते अडचणीत आहेत असं नाही. त्यांनी पाकिस्तानातील प्रशासकीय व्यवस्थेवर टीका करत राजकारणात देखील मोठ्या चर्चेला तोंड फोडलं आहे. त्यांनी सध्याच्या व्यवस्थेत बदल केला जावा याच्यावर भर दिला आहे. त्याचा पीपीपीसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.

Womens Aisa Cup 2026 Trophy Row
Women's Asia Cup 2026 | भारताने आठव्‍यांदा जिंकला आशिया चषक!

भारताची भूमिका अन् नक्वींचे नॅरेटिव्ह

भारताने आशिया कपमध्ये ट्रॉफी न घेण्याच्या भूमिकेमुळं आता आधीच तारे गर्दीश मैं असलेल्या नक्वींना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. कारण राजकारणात घटना घडली याला फारसं महत्व नसतं. ती घटना कशा प्रकारे सादर केली जाते हे महत्वाचं असतं. भारतात आपण नक्वींची पुन्हा कशी किरकिरी केली अशा दृष्टीकोणातून या घटनेकडे पाहिलं जाईल. मात्र पाकिस्तानात नक्वींचे समर्थक हे या घटनेकडे वेगळ्याच नजरेतून पाहत आहे. भारतानं विरोध केला मात्र नक्वी आपल्या जागेवरून अजिबात हलले नाहीत असं नॅरेटिव्ह सेट केलं जाऊ शकतं. क्रिकेटच्या मैदनातील वाद हा राजनैतिक नॅरेटिव्ह सेट करण्यात वापरला जात आहे.

Womens Aisa Cup 2026 Trophy Row
Mohsin Naqvi : म्हणे सूर्याला आता... नक्वींचं नवं नाटक, बीसीसीआयच्या मागणीनंतरही हट्ट सोडेनात

नक्वींसाठी का महत्वांचा आहे वाद

नक्वी या घडली पाकिस्तान क्रिकेटबाबत रडारवर आहेत. अशातच भारत - पाकिस्तान यांच्यातील कोणत्याही संघर्षाचं भांडवल मिळाल्यावर नक्वी विरोधी वातावरण अचानक बदलू शकतं. सध्या पाकिस्तान क्रिकेटची वाईट अवस्था आणि संघाची कामगिरी, निवडीतील वाद याच्यावर सुरू आहे.

आता या चर्चेचा रोख भारताने नक्वींच्या हातून ट्रॉफी का घेतली नाही? नक्वींनी काय केलं? हा राजकीय खेळ आहे. भारतात ज्या घटना नक्वींच्या विरोधात वापरल्या जाऊ शकतात. पाकिस्तानात त्याच घटना त्यांचे समर्थक भारतासमोर झुकले नाहीत असं नॅरेटिव्ह सेट केल्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.

आता नक्वी याचा राजकीय फायदा उचलतात की नाही हे सांगणं थोडं घाईचं ठरले. नक्वींनी राजकीय फायद्यासाठी हे जाणून बुजून रचलेलं षडयंत्र आहे का याचे सार्वजनिक प्रमाण नाहीये. मात्र भारतीय संघाने ट्रॉफी न स्विकारता नक्वींसाठी एक अजाणतेपणे राजकीय व्यसपीठ निर्माण करून दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news