

प्रशांतची आतापर्यंतची कारकीर्द
UPT20 League मध्येही चांगली कामगिरी
युवराजचा चाहता धोनीच्या कॅम्पमध्ये
मीलर या टोपण नावानं प्रसिद्ध
Prashant Veer IPL 2026: उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरने यंदाच्या आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्यासाठी धोनीच्या सीएसकेने १४.२ कोटी रूपये मोजले. विशेष म्हणजे प्रशांत वीरची बेस प्राईस ही ३० लाख रूपये होती. त्यावरून त्यानं लिलावात जवळपास १५ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली. त्यानंतर हा प्रशात वीर कोण ज्याच्यावर धोनीच्या सीएसकेनं एवढा विश्वास दाखवून एवढी मोठी बोली लागवली.
तर प्रशांत वीरच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. तो पॉवर हिटिंग करू शकतो अन् लेफ्ट आर्म स्पीन देखील गोलंदाजी करू शकतो. तो नुकतेच सईद मुश्ताक अली ट्रॉफीत दिसला होता. त्याने या स्पर्धेत सात सामने खेळले आहे. या २० वर्षाच्या खेळाडूने ३७.३३ च्या सरासरीने ११२ धावा केल्या होत्या. त्याचे स्ट्राईक रेट हे १६९.१९ इतका चांगला होता. त्यानं बिहारविरूद्धच्या सामन्यात ४० धावांची सर्वोच्च खेळी केली होती.
प्रशांतने गोलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. त्याने १८.७७ च्या सरासरीने सात डावात ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ही ६.७६ इतकी किफायतशीर आहे.
प्रशांत वीरने उत्तर प्रदेश टी २० लीग २०२५ मध्ये दमदार कामगिरी करत उद्योन्मुख खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. नोएडा सुपर किंग्जकडून खेळथाना त्याने १० डावात ३२० धावा ठोकल्या होत्या. त्याची सरासरी ६४.०० इतकी प्रभावी होती. त्याने तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. त्याच बरोबर त्यानं आठ विकेट्स देखील घेतल्या होत्या.
प्रशांत वीरचा युवराज सिंग हा आवडता खेळाडू आहे. त्याने एका मुलाखतीत हे सांगितलं होतं. याचबरोबर त्यानं आयपीएलमध्ये पाचवेळचा विजेता सीएसकेकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. त्याला एखादा हंगाम तरी महेंद्रसिंह धोनीसोबत खेळायचा होता आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
प्रशांतने मुलाखतीत सांगितलं की त्याने हॉस्टेल कॅम्प दरम्यान दक्षिण अफ्रिका संघाची जशी जर्सी असते तसी जर्सी घातली होती. त्यावेळी त्याचे कोच सुनिल यांनी त्याला मिलर असं टोपण नाव दिलं. तेव्हापासून त्याचं टोपण नाव हे मिलर झालं आहे.