
अबू धाबी : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि ग्लॅमरस लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आगामी सीझनसाठी खेळाडूंचा मिनी लिलाव (Mini Auction) आज (१६ डिसेंबर) संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी येथे पार पडत आहे. या लिलावात जगभरातील ३६९ खेळाडूंना संधी मिळणार असली तरी, केवळ ७७ जागांसाठी बोली लागून त्यांची निवड होणार आहे.
चेतन साकारिया (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
कुलदीप सेन (बेस प्राईज ७५ लाख) : बेस प्राईज
मोहम्मद वकार सलामखील (बेस प्राईज १ कोटी) : बेस प्राईज
दानिश मालेवार (बेस प्राईज ३० लाख) : मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
सलमान निजार (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
अक्षत रघुवंशी (बेस प्राईज ३० लाख) : लखनौने २.२० कोटी रुपयांना खरेदी केले.
सात्विक देसवाल (बेस प्राईज ३० लाख) : आरसीबीने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
अमन खान (बेस प्राईज ३० लाख) : सीएसकेने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
सदीकुल्लाह अटल (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
पथुम निस्सांका (बेस प्राईज ७५ लाख) : दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी रुपयांना विकत घेतले
राहुल त्रिपाठी (बेस प्राईज ७५ लाख) : केकेआरने बेस प्राईजमध्ये विकत घेतले.
शॉन अॅबॉट (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
मायकेल ब्रेसवेल (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
बेन दुवारशुइस (बेस प्राईज १ कोटी) : अनसोल्ड
जेसन होल्डर (बेस प्राईज २ कोटी) : गुजरात टायटन्सने ७ कोटी रुपयांना खरेदी केले.
डॅरिल मिशेल (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
दासुन शनाका (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
मॅथ्यू शॉर्ट (बेस प्राईज १.५० कोटी) : सीएसकेने १.५० कोटी रुपयांना खरेदी केली.
टॉम बेंटन (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
जॉर्डन कॉक्स (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
जोश इंग्लिस (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
टिम सेफर्ट (बेस प्राईज १.५० कोटी) : केकेआरने १.५० कोटी रुपयांना खरेदी केले.
काइल जेमिसन (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
अॅडम मिल्ने (बेस प्राईस २ कोटी) : अनसोल्ड
लुंगी एनडिगी (बेस प्राईस २ कोटी) : अनसोल्ड
मुस्तफिजूर रहमान (बेस प्राईस २ कोटी) : केकेआरने ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले.
वाहिदुल्लाह झद्रान (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
शिवम शुक्ला (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
यशराज पुंजा (बेस प्राईज ३० लाख) : राजस्थानने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
प्रशांत सोलंकी (बेस प्राईज ३० लाख) : केकेआरने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
विघ्नेश पुथूर (बेस प्राईज ३० लाख) : राजस्थानने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
करण शर्मा (बेस प्राईज ५० लाख) : अनसोल्ड
कुमार कार्तिकेय सिंग (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
अशोक शर्मा (बेस प्राईज ३० लाख) : गुजरात टायटन्सने ९० लाख रुपयांना खरेदी केले.
राज लिंबानी (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
कार्तिक त्यागी (बेस प्राईज ३० लाख) : केकेआरने कार्तिकला ३० लाख रुपयांना खरेदी केले.
सिमरनजीत सिंग (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
नमन तिवारी (बेस प्राईज ३० लाख) : लखनऊ सुपर जायंट्सने १ कोटी रुपयांना खरेदी केले.
आकाश माधवाल (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
सुशांत मिश्रा (बेस प्राईज ३० लाख) : राजस्थान रॉयल्सने ९० लाख रुपयांना खरेदी केले.
रुचित अहिर (बेस प्राईस ३० लाख) : अनसोल्ड
कार्तिक शर्मा (बेस प्राईस ३० लाख) : कार्तिकला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी सीएसके आणि केकेआरमध्ये स्पर्धा रंगली. यादरम्यान, बोली ११ कोटींपेक्षा जास्त रकमेपर्यंत पोहचली. पण अखेर सीएसकेने कार्तिकला १४.२० कोटी रुपयांना खरेदी केले.
मुकुल चौधरी (बेस प्राईस ३० लाख) : लखनौ सुपर जायंट्सने २.६० कोटी रुपयांना खरेदी केले.
तेजस्वी सिंग (बेस प्राईस ३० लाख) : केकेआरने ३ कोटी रुपयांना खरेदी केले.
वंश बेदी (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
तुषार रहेजा (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
प्रशांत वीर (बेस प्राईज ३० लाख) : प्रशांतला घेण्यासाठी सीएसके आणि लखनऊ स्पर्धा करत होते. राजस्थान रॉयल्सनेही स्पर्धेत एन्ट्री घेतली. ही बोली ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. पण अखेर सीएसकेने प्रशांतला १४.२० कोटी रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीचा अनकॅप्ड खेळाडू बनला.
शिवांग कुमार (बेस प्राईज ३० लाख) : सनरायझर्स हैदराबादने त्याला ३० लाख रुपयांना विकत घेतले.
तनुश कोटियन (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
कमलेश नागरकोटी (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
सनवीर सिंग (बेस प्राईज 30 लाख) : अनसोल्ड
आर्थव तायडे (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
अनमोलप्रीत सिंग (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
अभिनव तेजराणा (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
अभिनव मनोहर (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
यश धुल (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
आर्य देसाई (बेस प्राईज ३० लाख) : अनसोल्ड
राहुल चहर (बेस प्राईज १ कोटी) : अनसोल्ड
रवी बिश्नोई (बेस प्राईज २ कोटी) : राजस्थान आणि सीएसके यांच्यात स्पर्धा झाली. बिश्नोईसाठी बोली ५ कोटींपेक्षा जास्त झाली. राजस्थानने बिश्नोईसाठी ६ कोटींची बोली लावली, परंतु सनरायझर्स हैदराबादने लिलावात प्रवेश केला. अखेर राजस्थानने बिश्नोईला ७.२० कोटी रुपयांना विकत घेतले.
महेश तिक्षणा (बेस प्राईस २ कोटी) : अनसोल्ड
मुजीब उर रहमान (बेस प्राईस २ कोटी) : अनसोल्ड
अकील हुसेन (बेस प्राईस २ कोटी) : CSK ने २ कोटी रुपयांना विकत घेतले.
मॅट हेन्री (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
आकाश दीप (बेस प्राईज १ कोटी) : अनसोल्ड
जेकब डफी (बेस प्राईज २ कोटी) आरसीबीने २ कोटींना खरेदी केले.
शिवम मावीची (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
जेराल्ड कोएत्झी (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
मथिशा पाथिराना (बेस प्राईज २ कोटी) : दिल्ली आणि लखनऊमध्ये स्पर्धा लागली. पाथिरानाची बोली १३ कोटींपेक्षा जास्त झाली. अचानक केकेआरने पाथिरानासाठी १६ कोटींची बोली लावली, परंतु लखनऊ हार मानण्यास तयार दिसत नव्हते. केकेआरने १८ कोटींची बोली लावून पाथिरानाचा संघात समावेश केला.
स्पेन्सर जॉन्सन (बेस प्राईज १.५० कोटी) : अनसोल्ड
अॅनरिच नोर्टजे (बेस प्राईज २ कोटी) : लखनऊने २ कोटींना विकले.
फजलहक फारुकी (बेस प्राईज १ कोटी) : अनसोल्ड
केएस भरत (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
क्विंटन डी कॉक (बेस प्राईज १ कोटी) : सुरुवातीला मुंबई इंडियन्सने रस दाखवला आणि त्याला १ कोटी रुपयांच्या बेस प्राईजला खरेदी केले.
रहमानउल्लाह गुरबाज (बेस प्राईज १.५० कोटी) : अनसोल्ड
जॉनी बेअरस्टो (बेस प्राईज १ कोटी) : अनसोल्ड
जेमी स्मिथ (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
बेन डकेट (बेस प्राईज २ कोटी) : दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांच्या बेस प्राईजला खरेदी केले.
फिल अॅलन (बेस प्राईज २ कोटी) : केकेआरने २ कोटी रुपयांच्या बेस प्राईजला खरेदी केले.
गस अॅटकिन्सनची (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
रचिन रवींद्रची (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
लियाम लिव्हिंगस्टोन (बेस प्राईज २ कोटी) : अनसोल्ड
वियान मुल्डर (बेस प्राईज १ कोटी) : अनसोल्ड
वानिन्दु हसरंगा (बेस प्राईज २ कोटी) : लखनौने रस दाखवला आणि त्याला २ कोटीच्या मूळ किंमतीला विकत घेतले.
व्यंकटेश अय्यर (बेस प्राईज २ कोटी) : सुरुवातीला लखनौने रस दाखवला, परंतु केकेआर आणि आरसीबी वेंकटेशसाठी स्पर्धा करत असल्याचे दिसून आले. आरसीबीने त्याला ७ कोटींना विकत घेतले.
दीपक हुडाची (बेस प्राईज ७५ लाख) : अनसोल्ड
आयपीएल २०२६ च्या लिलावात दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये अनेक मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. एका बाजूला काही मोठे 'मॅचविनर' खेळाडू अनसोल्ड राहिले, तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडूंसाठी विक्रमी बोली लागली.
'कॅप ऑल-राउंडर्स' सेटमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरसाठी खरी लढत पाहायला मिळाली.
बोली युद्ध : सुरुवातीला लखनौ (LSG), गुजरात (GT) आणि बंगळूर (RCB) यांच्यात बोली लागली. बोली ३.४० कोटींवर असताना, त्याला मागील वर्षी २३.७५ कोटींना रिटेन करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अचानक एंट्री घेतली.
निकाल : KKR आणि RCB मध्ये चुरशीची लढत झाली, जी ७ कोटीवर पोहोचल्यावर KKR ने माघार घेतली. अखेर Venkatesh Iyer ७ कोटींमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB)मध्ये सामील झाला.
या सेटमध्ये काही मोठे आंतरराष्ट्रीय 'मॅचविनर' खेळाडू अनसोल्ड राहिल्याने मोठा धक्का बसला.
पहिल्या 'बॅटर्स' सेटमध्ये एक मोठा आणि धक्कादायक निर्णय पाहायला मिळाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सर्फराज खानला कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नाही.
यापूर्वी पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिल्यावर चाहत्यांना धक्का बसला होता. आता मुंबईकर फलंदाज सर्फराज खान, ज्याची बेस प्राईस केवळ ७५ लाख होती, त्यालाही कोणत्याही १० संघांनी विकत घेतले नाही.
फॉर्म असूनही दुर्लक्ष : देशांतर्गत हंगामात सर्फराजचा फॉर्म जबरदस्त आहे. लिलावापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने केवळ २२ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. इतका 'स्पार्कलिंग' फॉर्म असतानाही त्याला खरेदीदार न मिळणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे.
बॅटर्सचा सेट संपला : सर्फराज खान हा 'बॅटर्स 1' यादीतील शेवटचा खेळाडू होता, आणि तो अनसोल्ड राहिल्याने ही यादी संपली आहे.
अल्प विश्रांतीनंतर आता सगळ्यांचे लक्ष 'ऑल-राउंडर्स 1' यादीकडे लागले आहे. या यादीत मोठे खेळाडू आहेत आणि त्यांच्यावर विक्रमी बोली लागण्याची शक्यता आहे.
बोली अपेक्षित खेळाडू : इंग्लंडचा स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंग्स्टन (Liam Livingstone), त्याचाच सहकारी गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) आणि भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांचा समावेश आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावातील सर्वात मोठी बोली आता निश्चित झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन याला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) विक्रमी किमतीत खरेदी केले आहे!
ग्रीनसाठी सुरू असलेल्या तीव्र बोली युद्धात, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) बोली २५ कोटींच्या पुढे गेल्यावर माघार घेतली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी इतकी अंतिम आणि विक्रमी बोली लावत ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील केले.
कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) : २५.२० कोटी – कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
या खरेदीमुळे कॅमेरॉन ग्रीन आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) नंतर, कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये खेळणारा हा तिसरा संघ असेल. तो पुढील हंगामात केकेआरच्या आयकॉनिक जांभळ्या जर्सीत दिसणार आहे.
केकेआरकडे सर्वाधिक पर्स शिल्लक होती, आणि त्यांनी याचा पुरेपूर वापर करत ग्रीनसारखा 'गेम चेंजर' खेळाडू संघात घेतला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघात ग्रीनच्या समावेशामुळे फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी दोन्ही विभागांना मोठी ताकद मिळाली आहे. या एका मोठ्या खरेदीमुळे केकेआरचा संघ आता आयपीएल २०२६ च्या विजेतेपदासाठीचा प्रमुख दावेदार मानला जात आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने (Cameron Green) नवा इतिहास रचला आहे! कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील विक्रमी बोली युद्धामुळे ग्रीन आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू (Most Expensive Overseas Player) ठरला आहे.
ग्रीनची बोली २४.७५ कोटीच्या पुढे गेली आहे! आयपीएल २०२४ च्या लिलावात मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) कोलकाता नाईट रायडर्सने याच किमतीत विकत घेतले होते. ग्रीनने स्टार्कचा हा विक्रम मोडून आता एक नवा बेंचमार्क सेट केला आहे.
लिलावामध्ये सर्वाधिक मोठी पर्स (KKR कडे ६४.३ कोटी आणि CSK कडे ४३.४ कोटी) घेऊन आलेल्या या दोन माजी चॅम्पियन संघांनी ग्रीनला विकत घेण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे:
दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील अपयशानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि ग्रीनसारखा 'गेम-चेंजर' खेळाडू त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
बोली २४.७५ कोटींच्या पुढे जाऊनही दोन्ही फ्रँचायझी माघार घ्यायला तयार नाहीत.
कॅमेरॉन ग्रीनने परदेशी खेळाडूंचा विक्रम मोडला असला तरी, तो अजूनही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. हा विक्रमी 'वॉर' आता कोणत्या टप्प्यावर थांबतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावाच्या पहिल्या सेटमध्येच ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनसाठी जोरदार बोली लागली. लिलावात एक मोठा 'बॅटल' पाहायला मिळाला, जिथे मुंबई इंडियन्स (MI) ने सुरुवातीला 'माईंड गेम' खेळला.
MI ने लावली पहिली बोली, पण...
कॅमेरॉन ग्रीनची बेस प्राईस २ कोटी असताना, त्याच्यासाठी पहिली बोली लावणारा संघ होता मुंबई इंडियन्स (MI). मात्र, मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये केवळ २.७५ कोटी इतकीच रक्कम शिल्लक होती. त्यांनी इतक्या कमी रकमेसह इतक्या मोठ्या खेळाडूसाठी बोली लावली, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पण, बोलीची किंमत जशी २.७५ कोटीच्या पुढे गेली, तसे मुंबई इंडियन्स या 'वॉर'मधून शांतपणे बाहेर पडले. हा एक दबाव आणण्याचा प्रयत्न होता की, संघाचा बॅकअप प्लॅन, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
KKR vs RR : १० कोटींच्या पार
मुंबई बाहेर पडताच खरी लढाई सुरू झाली ती कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघांमध्ये. या दोन्ही संघांनी कॅमेरॉन ग्रीनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. बोली वेगाने वाढली आणि लवकरच ग्रीनच्या नावाची किंमत १० कोटीच्या पुढे गेली. कोलकाता नाईट रायडर्सकडे लिलावात सर्वाधिक पैसा (६४.३ कोटी) असल्याने, ते ग्रीनला विकत घेण्यासाठी आक्रमक दिसले.
आयपीएल २०२६ च्या लिलावात (IPL Auction 2026) काही मोठे खेळाडू 'अनसोल्ड' (Unsold) राहिल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला सलग दुसऱ्या हंगामातही कुणीही खरेदीदार मिळाला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि स्फोटक मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) याला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्याच्या बेस प्राईसमध्येच विकत घेतले.
डेव्हिड मिलर (David Miller) : ₹२ कोटी (बेस प्राईस) : दिल्ली कॅपिटल्स (DC)
दिल्ली कॅपिटल्सने ही बोली लावणारा एकमेव संघ होता, ज्यामुळे 'किलर मिलर' आता पुढील हंगामात दिल्लीच्या जर्सीत दिसणार आहे.
या लिलावात ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जेक फ्रेजर-मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) हा अनसोल्ड राहिला. पण सर्वात मोठा धक्का बसला तो पृथ्वी शॉ आणि डेव्हॉन कॉन्वे (Devon Conway) यांना.
पृथ्वी शॉ पुन्हा दुर्लक्षित : माजी दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर असलेल्या शॉला सलग दुसऱ्या हंगामात लिलावात कुणीही खरेदीदार मिळाला नाही. त्याची बेस प्राईस ७५ लाख होती.
डेव्हॉन कॉन्वे 'आउट' : चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे यालाही लिलावात दुर्लक्षित राहावे लागले.
या मोठ्या खेळाडूंना कुणीच संघात घेतले नाही, हे आयपीएल लिलावाचे मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने (CSK) यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा 'धक्का' देत आपल्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना दुसऱ्या संघाकडे ट्रेड केले आहे. पण या 'रिबिल्ड' प्रक्रियेत, पाचवेळच्या चॅम्पियन संघाने लिलावासाठी दुसरी सर्वात मोठी रक्कम शिल्लक ठेवली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या 'पर्स'मध्ये तब्बल ४३.४० कोटी इतकी मोठी रक्कम शिल्लक आहे. यामुळे लिलावामध्ये ते आपल्या गरजेनुसार मोठे 'मॅच-विनर' खरेदी करण्यास पूर्णपणे सक्षम असतील. कोलकाता नाईट रायडर्सनंतर (KKR) सर्वाधिक पैसा असलेला हा दुसरा संघ आहे.
सीएसकेने आपल्या संघातील दोन मोठे खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सॅम करन (Sam Curran) यांना राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड केले आहे. हा निर्णय आश्चर्यकारक असला तरी, त्यांनी राजस्थानचा स्टार खेळाडू आणि उत्कृष्ट यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात समाविष्ट केले आहे. यामुळे आता कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि एम. एस. धोनी (MS Dhoni) यांच्यासोबत संजू सॅमसनची नवीन 'पॉवर-पॅक' बॅटिंग युनिट तयार झाली आहे.
फलंदाजी : ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी, संजू सॅमसन, शिवम दुबे (Shivam Dube) आणि डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis).
गोलंदाजी : खलील अहमद (Khaleel Ahmed), नुर अहमद (Noor Ahmad) आणि नॅथन एलिस (Nathan Ellis).
या कोर टीममुळे सीएसकेला लिलावामध्ये फक्त काही महत्त्वपूर्ण जागा भरण्यावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. जडेजा आणि करनच्या जागी त्यांना एक तडफदार फिरकी अष्टपैलू आणि एक आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज विकत घेणे आवश्यक आहे.
CSK चा सध्याचा संघ (IPL 2026) : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (ट्रेड), आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, रामकृष्ण घोष, शिवम दुबे, उर्विल पटेल (यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, खलील अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नुर अहमद, श्रेयस गोपाळ, गुरजपनीत सिंग, जेमी ओव्हर्टन.
पंजाब किंग्ज (PBKS) संघाने काही मोठे निर्णय घेत संघात मोठे बदल केले आहेत. संघाकडे आता कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) हातात आली असून, संघाने लिलावासाठी तुलनेने कमी रक्कम शिल्लक ठेवली आहे.
पंजाब किंग्जकडे लिलावासाठी फक्त ११.५० कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. इतक्या कमी पैशांसह लिलावात उतरणारा हा कदाचित सर्वात 'मिनिमलिस्ट' संघ असेल. त्यांनी आपल्या मुख्य खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. त्यामुळे, लिलावात त्यांना मोजके पण अचूक 'टार्गेट' करावे लागणार आहे.
यावर्षी पंजाब किंग्जने आपल्या संघात अनेक 'मल्टी-युटिलिटी' खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यामुळे संघाचे संतुलन वाढले आहे.
नवीन नेतृत्व : श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी.
अष्टपैलूंची ताकद : मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis), मार्को जॅनसेन (Marco Jansen) आणि अझमतुल्ला उमरझाई (Azmatullah Omarzai) यांसारख्या धोकादायक आंतरराष्ट्रीय अष्टपैलूंमुळे संघाची क्षमता वाढली आहे.
गोलंदाजी : अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson), तसेच अनुभवी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) यांच्यामुळे गोलंदाजीचा विभाग मजबूत दिसतोय.
याशिवाय, मुशीर खान (Musheer Khan) आणि नेहल वढेरा (Nehal Wadhera) यांसारखे युवा स्टारही संघात आहेत.
पंजाब किंग्जचा सध्याचा संघ : श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर सिंग पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को जॅनसेन, मार्कस स्टॉइनिस, मिच ओवेन, मुशीर खान, नेहल वढेरा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, पायला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेवियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स (GT) मात्र 'मोजक्या' पैशांसह मैदानात उतरणार आहे. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील या संघाने त्यांचा मूळ ढाचा इतका मजबूत ठेवला आहे की, त्यांना लिलावात फारसा खर्च करण्याची गरजच वाटली नाहीये.
टायटन्सकडे लिलावासाठी फक्त १२.९० कोटी इतकीच रक्कम शिल्लक आहे. सर्वाधिक पैसा शिल्लक असलेल्या संघांच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे. याचा अर्थ गुजरात टायटन्स लिलावात फार 'मोठी बोली' लावण्याऐवजी, आपल्या संघातील मोजक्या जागा भरण्यावर आणि आवश्यक बॅकअप खेळाडू घेण्यावर लक्ष केंद्रित करेल.
संघाने आपल्या नेतृत्वाची धुरा युवा शुभमन गिलकडे सोपवली आहे, तर उप-कर्णधार म्हणून मिस्ट्री स्पिनर रशीद खान (Rashid Khan) आहे. सध्याचा संघ पाहिल्यास, त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही सर्वात मोठे 'मॅच-विनर' खेळाडू आहेत, ज्यामुळे त्यांची कोर टीम अत्यंत धोकादायक बनली आहे.
बॅटिंग पॉवर : जोस बटलर (Jos Buttler), साई सुदर्शन (Sai Sudharsan) आणि कर्णधार गिल.
अष्टपैलू आधार : वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), राहुल तेवतिया (Rahul Tewatia), शाहरुख खान (Shahrukh Khan).
वेगवान गोलंदाजी : कागिसो रबाडा (Kagiso Rabada), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna).
या 'जायंट' खेळाडूंमुळे संघात गुणवत्ता आणि अनुभव दोन्ही भरलेले आहेत.
आयपीएल २०२६ साठीचा लिलाव (IPL 2026 Auction) जसजसा जवळ येत आहे, तसतशी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची तयारी चर्चेचा विषय ठरत आहे. गतविजेत्या संघाने यंदाही आपला मूळ संघ बऱ्यापैकी मजबूत ठेवला असून, लिलावासाठी मोठी रक्कम शिल्लक ठेवली आहे.
हैदराबाद संघाने आपल्या 'पर्स'मध्ये तब्बल ₹२५.५ कोटी इतकी मोठी रक्कम शिल्लक ठेवली आहे. लिलावामध्ये आपल्या गरजेनुसार खेळाडूंना विकत घेण्यासाठी या मोठ्या रकमेचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
संघाच्या सध्याच्या यादीवर नजर टाकल्यास अनुभवी आणि उदयोन्मुख खेळाडूंचा उत्तम समन्वय दिसतो.
टॉप ऑर्डर : ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांच्यासारखे स्फोटक सलामीवीर, तसेच इशान किशन (Ishan Kishan) आणि हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) यांच्यामुळे मधली फळी अत्यंत मजबूत झाली आहे.
अष्टपैलू आणि गोलंदाजी : कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) यांच्यासोबत नितीश रेड्डी (Nitish Reddy), हर्षल पटेल (Harshal Patel), जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat), एशान मलिंगा (Eshan Malinga) आणि ब्रायडन कार्स (Brydon Carse) यांसारखे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज संघात आहेत.
SRH चा सध्याचा संघ (IPL 2026) : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर स्मारन, इशान किशन, हेन्रिक क्लासेन, नितीश रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, एशान मलिंगा, झीशान अन्सारी.
२०२६ च्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल. लिलावात हे उर्वरित २५.५ कोटी रुपये वापरून ते आणखी कोणते 'मॅच-विनर' खेळाडू विकत घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
यंदाच्या लिलावात सर्वाधिक खेळाडू खरेदी करण्याची संधी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघांना आहे. या दोन्ही संघांना मिळून एकूण २२ खेळाडूंच्या जागा भरायच्या आहेत. त्यांच्या पर्समध्ये इतर संघांपेक्षा सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे, ज्यामुळे ते मोठ्या खेळाडूंवर सहजपणे बोली लावू शकतात. त्यांच्यासोबतच, सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाकडेही २५.५ कोटी रुपयांची मोठी रक्कम शिल्लक असून, त्यांना त्यांच्या संघात १० खेळाडूंचा समावेश करायचा आहे.
विदेशी खेळाडूंसोबतच अनेक भारतीय खेळाडूंवरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. यामध्ये वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), सरफराज खान (Sarfaraz Khan), फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या खेळाडूंना फ्रँचायझींकडून मोठी रक्कम मिळू शकते.
यंदाच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) हा सर्वात महागडा खेळाडू ठरेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विशेषतः, 'सर्वाधिक पैशांची पर्स' (Highest Purse) असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघांमध्ये ग्रीनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळू शकते.
परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडचा आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि ऑस्ट्रेलियाचा युवा सनसनाटी फलंदाज जेक फ्रेशर-मैकगर्क (Jake Frasr-McGurk) यांनाही मोठी मागणी असेल.