Medhavi Bidhuri: विकेट पडताच केलं ‘6-7’ सेलिब्रेशन; रातोरात व्हायरल झालेली मेधावी बिधुरी आहे तरी कोण? सोशल मीडियावर धुमाकूळ

Who Is Medhavi Bidhuri: दिल्लीची युवा लेगस्पिनर मेधावी बिधुरी विकेट घेतल्यानंतर केलेल्या ‘6-7’ सेलिब्रेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Who Is Medhavi Bidhuri
Who Is Medhavi BidhuriPudhari
Published on
Updated on

Who Is Medhavi Bidhuri: महिला दिल्ली प्रीमियर लीग 2026 मध्ये एका अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीची युवा क्रिकेटपटू मेधावी बिधुरी हिने विकेट घेतल्यानंतर केलेल्या ‘6-7’ सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

20 ऑगस्ट रोजी सेंट्रल दिल्ली क्वीन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्झ यांच्यातील सामन्यात हा प्रसंग घडला. डावाच्या 16व्या षटकात मेधावीने निशिका सिंगला बाद केले. मिडविकेटवर अरुषी गोयलने शानदार डाईव्ह मारत झेल घेतला. विकेट मिळताच मेधावीने दोन्ही हात वर-खाली करत खास ‘6-7’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.

सध्या ‘6-7’ हा ट्रेंड विशेषतः Gen Z आणि Gen Alpha मध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे मेधावीच्या या सेलिब्रेशनने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात तिने 4 षटकांत 24 धावा देत 2 विकेट घेतल्या. मात्र, सेंट्रल दिल्ली क्वीन्सला हा सामना 29 धावांनी गमवावा लागला.

67 नंबरच्या जर्सीमागे आहे खास कारण

मेधावीच्या व्हायरल सेलिब्रेशनमागे एक मजेशीर किस्साही आहे. तिला तिचा नेहमीचा 12 नंबरचा जर्सी नंबर हवा होता. मात्र, तो नंबर आधीच दुसऱ्या खेळाडूकडे असल्याने तिला दुसरा नंबर निवडावा लागला.

त्यावेळी तिच्या धाकट्या बहिणीने तिला 67 नंबरची जर्सी घालण्याची कल्पना दिली. ‘6-7’ ट्रेंड लक्षात घेऊन तिने हाच नंबर निवडला आणि विकेट घेतल्यानंतर त्याच्याशी जोडलेले हे खास सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला.

Who Is Medhavi Bidhuri
Chhatrapati Sambhajinagar: खवड्या डोंगर दुर्घटनेत ‘आयफोन कनेक्शन’ नाहीच? पोलिसांचा धक्कादायक खुलासा; नेमकं काय घडलं?

कोण आहे मेधावी बिधुरी?

मेधावी बिधुरी ही 20 वर्षीय लेगस्पिनर आहे. तिने दिल्लीच्या अंडर-19 संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली प्रीमियर लीगच्या 2025 हंगामात तिने साऊथ दिल्ली सुपरस्टार्झकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली होती. सेंट्रल दिल्ली क्वीन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने केवळ 3 षटकांत 26 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. तिच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे साऊथ दिल्ली सुपरस्टार्झने अवघ्या एका धावाने सामना जिंकत विजेतेपद पटकावले होते.

Who Is Medhavi Bidhuri
Sugar Price Rise: साखर महागली! आता चहा, मिठाई आणि कोल्ड ड्रिंकचे दरही वाढणार? ग्राहकांना मोठा झटका

मेधावीने महिला प्रीमियर लीगच्या 2024 च्या लिलावासाठीही आपली नोंदणी केली होती. त्यामुळे दिल्लीच्या क्रिकेटविश्वाबाहेरही तिच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

आता DPL 2026 मध्ये सेंट्रल दिल्ली क्वीन्सकडून खेळणाऱ्या मेधावीने पहिल्याच सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत. मात्र, तिच्या गोलंदाजीपेक्षाही सध्या तिचे ‘6-7’ सेलिब्रेशन अधिक चर्चेत असून, या युवा लेगस्पिनरला सोशल मीडियावर नवी ओळख मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news