West Indies vs Sri Lanka : टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील मोठी पार्टनरशिप; वेस्‍ट इंडिजच्‍या फलंदाजांची ४०१ धावांची भागीदारी!

कसोटी क्रिकेटमधील २० वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड आजही अबाधित!
West Indies vs Sri Lanka
West Indies vs Sri Lanka : वेस्ट इंडिजचे फलंदाज आमिर जंगू आणि रोस्टन चेस यांच्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान ४०० हून अधिक धावांची भागीदारी पाहायला मिळाली Pudhari
Published on
Updated on

West Indies vs Sri Lanka test record : कसोटी क्रिकेटमध्‍ये सहाव्‍या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप टेस्ट क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळानंतर ४०० हून अधिक धावांची भागीदारी पाहायला मिळाली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज आमिर जंगू आणि रोस्टन चेस यांच्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान ही ऐतिहासिक पार्टनरशिप झाली. आमिर जंगूने दुहेरी शतक ठोकून २३३ धावा केल्या, तर त्याचा साथीदार रोस्टन चेसने १९४ धावांची खेळी खेळली. कर्णधार चेसचे दुहेरी शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.

सहाव्‍या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप

६ व्या विकेटसाठी टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पार्टनरशिप आहे. या मोठ्या भागीदारीनंतर, टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या विकेटसाठी आणि कोणत्या दोन फलंदाजांमध्ये आहे, हे जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत.

West Indies vs Sri Lanka
ICC Test Rankings : जो रूटने 'नंबर 1' चा मुकुट गमावला! शुभमन गिलची टॉप-१० मध्ये झेप!

किती धावांच्‍या पार्टनरशिपचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड?

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा वर्ल्ड रेकॉर्ड श्रीलंकेच्या दोन दिग्गज फलंदाजांच्या नावावर आहे. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावांची भागीदारी करून वर्ल्ड रेकॉर्ड रचला होता. गेल्या २० वर्षांत आजतागायत कोणत्याही जोडीला हा विक्रम मोडता आलेला नाही.

West Indies vs Sri Lanka
Mohammed Siraj angry | मोहम्मद सिराजचा पारा चढला! कसोटी सामन्यादरम्यान अफगाणिस्तानच्या फलंदाजासोबत नेमकं काय वाद झाला?

जयवर्धनेने झळकावले होते त्रिशतक

संगकारा आणि जयवर्धने यांच्यातील ही भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी झाली होती. या मॅचमध्ये जयवर्धनेने डावाची सुरुवात करत त्रिशतक (Triple Century) झळकावले होते आणि ३७४ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली होती. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या कुमार संगकारानेही २८७ धावा करत दुहेरी शतक ठोकले होते, त्याचे त्रिशतक अवघ्या १३ धावांनी हुकले होते.

West Indies vs Sri Lanka
AUS vs ENG | तब्बल १३८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात प्रथमच असं घडलं! ॲशेसमधील पाचव्‍या कसोटीपूर्वी मोठा निर्णय

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील एकूण ६ वी सर्वात मोठी भागीदारी

आमिर जंगू आणि रोस्टन चेस यांनीही कसोटी क्रिकेटमध्‍ये रचला इतिहास आहे. आमिर जंगू आणि रोस्टन चेस या जोडीने ४०१ धावांची भागीदारी करून ६ व्या किंवा त्याखालील विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तसेच टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही एकूण ६ वी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

भारताची कसोटीतील सर्वात मोठी पार्टनशिप किती धावांची?

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी थोडी निराशेची बाब म्हणजे या यादीत एकाही भारतीय जोडीचे नाव अव्वल स्थानांवर नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी पार्टनरशिप ४१३ धावांची आहे, पंकज रॉय आणि विनु मांकड यांनी जानेवारी १९५६ मध्ये चेन्नईत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी केली होती. विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्यात २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४१० धावांची भागीदारी झाली होती.

West Indies vs Sri Lanka
AUS vs ENG 3rd Test : ॲडलेड कसोटीत ‘Snicko’ वरून वाद पेटला..! मिचेल स्टार्कचा संताप, थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप

  • १ ली विकेट: नील मॅकेन्झी / ग्रॅमी स्मिथ (४१५ धावा vs बांगलादेश)

  • २ री विकेट: सनथ जयसूर्या / रोशन महानामा (५७६ धावा vs भारत)

  • ३ री विकेट: कुमार संगकारा / महेला जयवर्धने (६२४ धावा vs दक्षिण आफ्रिका)

  • ४ थी विकेट: जो रूट / हॅरी ब्रूक (४५४ धावा vs पाकिस्तान)

  • ५ वी विकेट: डॉन ब्रॅडमन / सिड बार्न्स (४०५ धावा vs इंग्लंड)

  • ६ वी विकेट: आमिर जंगू / रोस्टन चेस (४०१ धावा vs श्रीलंका)*

  • ७ वी विकेट: डेनिस एटकिन्सन / क्लेरमोंटे डेपियाझा (३४७ धावा vs ऑस्ट्रेलिया)

  • ८ वी विकेट: स्टुअर्ट ब्रॉड / जोनाथन ट्रॉट (३३२ धावा vs पाकिस्तान)

  • ९ वी विकेट: मार्क बाउचर / पॅट सिमकॉक्स (१९५ धावा vs पाकिस्तान)

  • १० वी विकेट: जो रूट / जेम्स अँडरसन (१९८ धावा vs भारत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news