ICC Test Rankings : जो रूटने 'नंबर 1' चा मुकुट गमावला! शुभमन गिलची टॉप-१० मध्ये झेप!

ICC Test Rankings | हॅरी ब्रूक पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान
ICC Test Rankings
इंग्लंडचा कसोटीतील स्‍टार फलंदाज जो रूट याने ICC Test Rankingमधील नंबर-१ स्‍थान गमावले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची टॉप-१० मध्ये झेप घेतली आहे. Pudhari
Published on
Updated on

ICC Test Rankings :आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी खेळाडूंची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. यामध्‍ये मोठा फेरबदल झाला आहे. इंग्लंडचा कसोटीतील स्‍टार फलंदाज जो रूट नंबर-१ स्‍थान गमावले आहे. रूटचा सहकारी खेळाडू हॅरी ब्रूक पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. ब्रूकच्या खात्यात सध्या ८६९ रेटिंग पॉइंट्स आहेत, तर रूट ८५३ पॉइंट्ससह थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (८५३ पॉइंट्स) आता ब्रूकनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

खराब कामगिरीचा रुटला बसला फटका

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीचा फटका जो रूटला सहन करावा लागला. त्याने पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात केवळ ८ धावा केल्या. दुसरीकडे, ब्रूकने अर्धशतकी (५६ धावा) खेळी केली होती. इंग्लंडने लॉर्ड्सवर झालेली ही कसोटी ११५ धावांनी जिंकली होती.

ICC Test Rankings
T20 World Cup Final : भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता! अहमदाबादमध्ये किवींचा ९६ धावांनी धुव्वा उडवत रचला इतिहास

शुभमन गिलची टॉप-१० मध्ये झेप

भारतीय कर्णधार शुभमन गिल (७४३ पॉइंट्स) हा आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलने मुल्लानपूर येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत १२६ धावांची दमदार खेळी केली होती. भारताने या सामन्यात अफगाणिस्तानचा एक डाव आणि ३०० धावांनी पराभव केला. डावाच्या फरकाने मिळालेला भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (७३३ पॉइंट्स) एका स्थानाने घसरून नवव्या क्रमांकावर आला आहे, त्याने मुल्लानपूर कसोटी सामन्यात २४ धावांचे योगदान दिले होते.

ICC Test Rankings
AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथचे विक्रमी क्षेत्ररक्षण..! 'बॉक्सिंग डे' कसोटीत मोडला राहुल द्रविडचा विक्रम

ऋषभ पंत १२ व्‍या स्‍थानावर पोहोचला

विकेटकीपर ऋषभ पंतला (७०५ पॉइंट्स) एका स्थानाचा फायदा झाला असून तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने मुल्लानपूर कसोटीत ८१ धावांची खेळी केली होती. याशिवाय, बेन डकेट (तीन स्थानांच्या फायद्यासह १५ व्या), जेमी स्मिथ (पाच स्थानांच्या फायद्यासह २३ व्या) आणि ग्लेन फिलिप्स (१५ स्थानांची झेप घेत ४० व्या) यांना लॉर्ड्स कसोटीतील चांगल्या कामगिरीचा फायदा मिळाला आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह नंबर-१वर अबाधित

भारताचा जसप्रीत बुमराह ८७० पॉइंट्ससह जगातील नंबर-१ कसोटी गोलंदाज कायम आहे. बुमराह अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत खेळला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क (८३८ पॉइंट्स) दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑलराउंडर्सच्या यादीत भारताचा रवींद्र जडेजा (४४६ पॉइंट्स) नंबर-१ वर कायम आहे, तो देखील मुल्लानपूर कसोटीत भारतीय संघाचा नव्‍हता.

ICC Test Rankings
Mohammed Shami dropped | मोहम्मद शमीकडे पुन्‍हा दुर्लक्ष! BCCIने दिले "नो डिस्कशन"चे कारण

वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनची सातव्‍या स्‍थानी झेप

कसोटी गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन सात स्थानांची झेप घेत १० व्या क्रमांकावर आला आहे. तसेच, कसोटी ऑलराउंडर्सच्या यादीतही त्याने दोन स्थानांची प्रगती करत ६ वे स्थान गाठले आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रिकेटमध्‍ये पुनरागमन करणारे वेगवान गोलंदाज काइल जेमीसन (२२ व्या) आणि ओली रॉबिन्सन (२३ व्या) यांनी कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पुन्हा स्थान मिळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news