

Virat Kohli Will Play In Vijay Hazare Trophy: बीसीसीआयने स्टार विराट कोहलीला अनेकवेळा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची विनंती केली होती. मात्र विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सातत्यानं नकार दिला होता. यावेळीही विराट कोहलीनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे अशी इच्छा होती. मात्र विराटने नकार दिल्याचं समजलं होतं. मात्र आता अचानक विराट कोहलीने तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे १५ वर्षानंतर विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
विराट कोहलीने अचानक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय का घेतला याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एका रिपोर्टनुसार रांचीमधील वनडे सामन्यानंतर विराट कोहलीने सार्वजनिकरित्या एक वक्तव्य केलं होतं. यावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीने अचानक देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीने दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात १३५ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. या खेळीनंतर मी खूप तयारीनिशी खेळणारा खेळडू राहिलेलो नाहीये. जोपर्यंत मी मानसिकदृष्टा मजबूत आहे असं फील करतो तोपर्यंत खेळू शकतो.
कोहली म्हणाला होता की, 'मी ३०० पेक्षा जास्त नवडे सामने खेळलो आहे. मी १५ ते १६ वर्षापासून सतत खेळत आहे. जर तुम्ही नेटमध्ये कोणताही ब्रेक न घेता दीड तास फलंदाजी करू शकता तर तुमची तयारी परीपूर्ण आहे.'
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीचं हेच वक्तव्य बीसीसीआयला आवडलं नाही. बीसीसीआयने जर वनडे संघाचा घटक रहायचं असेल तर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं असा सल्ला विराट आणि रोहितला दिला होता.
रोहितने आधीच मुंबई क्रिकेट असोसिएशनला आपण विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. दुसरीकडं विराट कोहलीनं अजून कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र अखेर दिल्ली क्रिकेट असोसिएशनने विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे.
डीडीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. तो सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होणारे सामने खेळणार आहे. दिल्ली २४ डिसेंबर पासून आंध्र प्रदेशविरूद्ध विजय हजारे ट्रॉफीची मोहीम सुरू करणार आहे.