Virat Kohli Century Hattrick : विक्रमादित्य कोहलीचा 'रन-वर्षाव' कायम! विश्वविक्रमी कामगिरी करत शतकांची अनोखी 'हॅट्ट्रिक'

Virat Kohli World Record : कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये आपली जबरदस्त फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे.
Virat Kohli Century Hattrick : विक्रमादित्य कोहलीचा 'रन-वर्षाव' कायम! विश्वविक्रमी कामगिरी करत शतकांची अनोखी 'हॅट्ट्रिक'
Published on
Updated on

रायपूर : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपला झंझावात सुरूच ठेवला आहे. रांची येथील वनडे सामन्यातील शानदार फॉर्म कायम राखत कोहलीने रायपूरमध्येही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावले. यासह, त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

सलग शतकांची अनोखी 'हॅट्ट्रिक': विश्वविक्रमी कामगिरी

कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये आपली जबरदस्त फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे. रायपूर येथे सुरू असलेल्या सामन्यात कोहलीने शानदार शतक झळकावत क्रीडाप्रेमींना आनंद दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही त्याची सलग तिसरी शतकी खेळी ठरली आहे.

किंग कोहलीची ‘हॅट्रिक’

विराट कोहलीने या सामन्यात ९३ चेंडूत ७ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांच्या मदतीने १०२ धावांची दमदार खेळी केली. या शतकासह, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील तीन एकदिवसीय डावांमध्ये सलग तीन शतके झळकावण्याचा अविश्वसनीय पराक्रम केला आहे.

  • १००* : कोलकाता, CWC २०२३ (मागील विश्वचषकातील सामना)

  • १३५ : रांची, २०२५ (सध्याच्या मालिकेतील पहिला सामना)

  • १०२ : रायपूर, २०२५ (सध्याच्या मालिकेतील ताजा सामना)

सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत

विराट कोहलीने यावेळी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा आणखी एक विक्रम मोडून काढला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २६ व्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याची किमया साधली आहे. यासह, तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५ वेळा ५०+ धावा केल्या होत्या.

द. आफ्रिकेविरुद्ध ५०+ स्कोअर (आंतरराष्ट्रीय)

  • विराट कोहली : २६ वेळा

  • सचिन तेंडुलकर : २५ वेळा

  • राहुल द्रविड : २१ वेळा

  • सौरव गांगुली : १८ वेळा

  • मोहम्मद अझरुद्दीन : १३ वेळा

  • अजिंक्य रहाणे : १२ वेळा

  • रोहित शर्मा : १२ वेळा

कोहलीचे या वनडे मालिकेतील लागोपाठ दुसरे शतक ठरले. रायपूरमध्ये त्याने सुरुवातीला संयमी आणि नंतर आक्रमक फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. या शतकाच्या बळावर किंग कोहली वनडे क्रिकेटच्या इतिहासात ११ व्यांदा सलग दोन किंवा त्याहून अधिक डावांमध्ये शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अविश्वसनीय सातत्य दर्शवणारी कामगिरी आहे.

५३वे वनडे शतक : आंतरराष्ट्रीय '८४'

विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५३ वे शतक पूर्ण केले. तर त्याच्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ८४ वे शतक ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये त्याचे हे ७ वे शतक आहे.

या सामन्यात कोहलीने ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर वेग वाढवत ९० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अखेर ९३ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने १०२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

गायकवाडसोबत अभूतपूर्व भागीदारी

या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीने युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (१०५ धावा) याच्यासोबत मिळून १५६ चेंडूत १९५ धावांची एक शानदार भागीदारी रचली. या मोठ्या भागीदारीमुळेच भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news