Rahul Shelke
मांबा मेंटेलिटी म्हणजे रोज स्वतःला आधीपेक्षा चांगलं बनवण्याची जिद्द. ही फिलॉसॉफी बास्केटबॉल लिजेंड कोबे ब्रायंटने जगाला दिली.
कोबेनं सांगितलं, कोणतीही गोष्ट एका दिवसात मिळत नाही. दररोजच्या सरावातून, समर्पणातून आणि लढाऊ वृत्तीतून ती घडते.
पडलात तरी पुन्हा उभे राहा, हे तत्त्व आहे. दबाव असताना शांत राहणे आणि सतत शिकत राहणे हीच खरी ताकद आहे.
कोहलीने फिटनेसला प्राधान्य दिलं, शिस्त आणि परफॉर्मन्स सुधारण्याची त्याची धडपड आहे, हे सगळं मांबा मेंटेलिटीचंच तत्त्वज्ञान आहे.
स्वतःशी स्पर्धा करणं हेच मांबा मेंटेलिटीचा महत्त्वाचा भाग आहे. आजच्यापेक्षा उद्या चांगलं होणं यातूनच माणूस घडतो.
ही मेंटेलिटी बिझनेस, शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्यातही लागू होते. मेहनत, फोकस आणि धाडस, ही तिची तीन मोठी शस्त्रं आहेत.
दडपण वाढलं की बहुतेक लोक मागे हटतात. पण मांबा मेंटेलिटी म्हणते, हीच वेळ असते ती तुमचं खरं कॅरेक्टर दाखवते.
विराट कोहलीपासून जगभरच्या टॉप एथलीट्सपर्यंत सर्वांनी ही फिलॉसॉफी स्वीकारली आहे. त्यांच्या यशामागे ही मेंटेलिटी मोठं कारण मानली जाते.
हे फक्त मोटिवेशन नाही, तर ही जगण्याची पद्धत आहे. तुम्हीही ही मेंटेलिटी स्वीकारली तर आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता.