

Virat Kohli Refuses To Play Vijay Hazare Trophy
नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे . मात्र विराट कोहलीने कोहलीने देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. विराटने यासंदर्भात औपचारिक घोषणा केली नसली तरी त्याचा निर्णय कायम राहिल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीसमोरील संघ निवडीचा पेच आणखी वाढणार आहे.
बीसीसीआय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी उपलब्ध खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित केले आहे. बीसीसीआयच्या आग्रहामुळेच रोहित आणि कोहली दोघेही ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कसोटी मालिकेनंतर रणजी करंडक खेळू शकले होते. रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीला त्याची उपलब्धता आधीच पुष्टी केली आहे. दुसरीकडे, कोहलीने असा विश्वास आहे की तो 'अति तयारी'च्या बाजूने नाही. त्यामुळे बीसीसीआय पुढील पेच कायम आहे.
'एनडीटीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली खेळू इच्छित नाही. या स्पर्धेत रोहित शर्मा खेळत असेल, तेव्हा एक खेळाडूला अपवाद कसा असू शकतो? आपण इतर खेळाडूंना काय सांगू? की कोणीतरी तुमच्या सर्वांपेक्षा वेगळा आहे?" सूत्रांनी नमूद केले आहे. त्यामुळे विराट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास निवड समितीला निर्णय घेणे अवघड होणार आहे.
रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला होता की, "मी कधीही अति तयारीवर विश्वास ठेवला नाही. माझे सर्व क्रिकेट मानसिक आहे. मी शारीरिकदृष्ट्या खूप मेहनत करतो. माझी फिटनेसची क्षमता वाढलेली असेल फलंदाजी उत्तम होते."