Virat Kohli IPL 2026: किंग थकलाय.. विराट कोहलीचा 'इम्पॅक्ट' आता Impact Player पुरताच मर्यादित होणार?

Virat Kohli IPL 2026
Virat Kohli IPL 2026pudhari
Published on
Updated on

Virat Kohli Impact Player IPL 2026: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आपला पुढचा सामना हा दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना आरसीबीचे होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियमवर आज होत आहे. गेल्या लखनौ सुपरजायंट्सविरूद्धच्या सामन्यात आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता. विराट कोहलीला मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या घोटा दुखावला होता. त्यामुळं तो मुंबईविरूद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी देखील आला नव्हता. मात्र लखनौविरूद्ध तो फक्त फलंदाजीला आला आणि त्याने ४९ धावांची दमदार खेळी केली.

Virat Kohli IPL 2026
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटवर नाराज? कोचने केला मोठा खुलासा

आजच्या सामन्यापूर्वी विराट कोहली पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार की क्षेत्ररक्षणासाठी उतरून घरच्या मैदानावर संघाला चार्जअप ठेवणार हा पेच निर्माण झाला आहे. विराटचा फिटनेस आणि संघ व्यवस्थापनाची रणनिती या दोन गोष्टींवर विराटचा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात 'इम्पॅक्ट' किती काळ असणार हे अवलंबून आहे.

Virat Kohli IPL 2026
Vaibhav sooryavanshi : वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सला कसा मिळाला होता? ‘त्या’ एका मेसेजने गवसला क्रिकेटचा नवा 'सुपरस्टार'

आरसीबीची दमदार कामगिरी

यंदाच्या हंगामात आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सविरूद्धचा सामना वगळता इतर सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी सनराईजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना पराभूत करत गुणतालिकेत सध्याच्या घडीला दुसरे स्थान पटकावलं आहे.

जर दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना आरसीबीने जिंकला तर आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाऊ शकते. हेड टू हेड रेकॉर्ड पाहिलं तर आरसीबीने दिल्लीविरूद्धच्या आतापर्यंत ३३ सामन्यातील २० सामन्यात विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. दिल्लीने १२ सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे.

Virat Kohli IPL 2026
Virat Kohli: "त्याच्याबद्दल वाईट वाटले..." विराट कोहलीने लाईक केलेली इन्फ्लुएन्सर लिझलॅझ काय म्हणाली?

कसं असेल संघाचं कॉम्बिनेशन?

आरसीबीच्या टीम कॉम्बिनेशनबाबत बोलायचं झालं तर विराट कोहली या सामन्यात पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. तसेच तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नाही तर रेग्युलर खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची देखील शक्यता आहे. मात्र जर संघ व्यवस्थापनाने वर्क लोड मॅनेजमेंटचा मुद्दा पुढे केला तर विराट कोहली या देखील सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची शक्यता आहे.

गेल्या सामन्यातील विजयानंतर विराट कोहलीने तो पूर्णपणे फिट नसल्याचं कबूल केलं होतं. त्याचा गुडघा दुखावल असून तो थोडा आजारी देखील असल्याचे सांगितलं होते. असं असलं तरी तो त्याच्या फलंदाजीतील योगदानावर समाधानी आहे.

Virat Kohli IPL 2026
Who Is LizLaz: विराट कोहलीच्या एका लाइकमुळे सोशल मीडियावर राडा; कोण आहे जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाज?

विराट काय म्हणाला?

विराट कोहली लखनौविरूद्धच्या सामन्यानंतर म्हणाला होता की, 'गेल्या सामन्यापेक्षा आता माझी स्थिती खूप चांगली आहे. मी अजूनही शंभर टक्के फिट नाहीये. गेल्या सामन्यात माझा गुडघा थोडा सुजला होता. मी आज चांगली सुरूवात केली. मी माझ्या योगदानाबद्दल समाधानी आहे.'

तो पुढे म्हणाला, 'मला शेवटपर्यंत खेळून सामना फिनिश करायला आवडतं. मात्र कधी कधी तुम्हाला परिस्थितीचा देखील विचार करावा लागतो. खेळपट्टी खूप संथ झाली होती. मी जसा खेळत होतो तसाच खेळण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी मी सामना संपवायला हवा होता.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news