Virat Kohli: "त्याच्याबद्दल वाईट वाटले..." विराट कोहलीने लाईक केलेली इन्फ्लुएन्सर लिझलॅझ काय म्हणाली?

German influencer LizLaz on Virat Kohli: विराट कोहलीने लाईक केलेल्या जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझने प्रतिक्रिया दिली आहे. विराटची चाहती असलेल्या लिझलॅझने नेमकं काय म्हटलं आहे?
Virat Kohli Instagram like LizLaz Photo
Virat Kohli Instagram like LizLaz Photo file photo
Published on
Updated on

Virat Kohli Instagram like LizLaz Photo

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर असो वा मैदानाबाहेर, तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. नुकतेच विराटने सोशल मीडियावर जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझच्या फोटोला लाईक केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकरणावर आता इन्फ्लुएन्सर लिझलॅझने आपली प्रतिक्रिया दिली असून, विराटला विनाकारण ट्रोल होताना पाहून आपल्याला वाईट वाटल्याचे तिने म्हटले आहे.

विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझ आणि फोटोग्राफर अद्वैत वैद्य यांच्या एका जुन्या पोस्टला लाईक केले होते. विशेष म्हणजे विराट या अकाउंटला फॉलो करत नाही, तरीही त्याने हा फोटो लाईक केल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. विराटच्या या कृतीनंतर काही वेळातच त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आणि मीम्सचा पाऊस पडला. विराटने नंतर ते लाईक काढून टाकले.

Virat Kohli Instagram like LizLaz Photo
GT vs KKR | शुभमन गिलची वादळी खेळी; गुजरात टायटन्सचा कोलकातावर 5 गडी राखून थरारक विजय

काय म्हणाली लिझलाझ?

या प्रकरणावर 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना लिझलॅझ म्हणाली, "सुरुवातीला विराटसारख्या मोठ्या खेळाडूने माझा फोटो लाईक केल्याचा मला खूप आनंद झाला होता. पण त्यानंतर त्याला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आले आणि ज्या दबावात त्याने ते लाईक काढले, त्याचे मला वाईट वाटले. एका साध्या लाईकवरून इतकी मोठी बातमी कशी काय बनू शकते, याचे मला आश्चर्य वाटते. त्याचा कोणताही चुकीचा उद्देश नसावा, पण तरीही त्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्याची आभारी आहे."

कोहलीच्या लाईकबद्दल लिझलॅझला कधी कळले?

लिझलॅझला या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावरूनच मिळाली. ती म्हणाली, "विराटने तो फोटो नेमका कधी लाईक केला, हे मलाही माहित नव्हते. जेव्हा मी सकाळी उठले, तेव्हा सोशल मीडियावर सगळीकडे माझीच चर्चा होती. अनेकांनी मला मेसेज करून याबद्दल विचारले. लोक खूप उत्साही होते, पण विराटला ट्रोल होताना पाहणे क्लेशदायक होते."

विराटची चाहती आहे लिझलाझ

विराटच्या या लाईक प्रकरणासोबतच लिझलॅझचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' संघाला पाठिंबा देताना दिसत आहे. "गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान माझ्या बेंगळुरूच्या मित्रांमुळे मी आरसीबीची चाहती झाले. आरसीबीचा विषय निघाल्यावर विराट कोहली हा सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे त्याने माझ्या फोटोला लाईक करणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती," असेही तिने स्पष्ट केले.

Virat Kohli Instagram like LizLaz Photo
Who Is LizLaz: विराट कोहलीच्या एका लाइकमुळे सोशल मीडियावर राडा; कोण आहे जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाज?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news