Vinesh Phogat |"देशाला अभिमान वाटावा अशी तिची कामगिरी" : कुस्तीपटू विनेश फोगाटला 'सर्वोच्च' दिलासा

Supreme Court on Vinesh Phogat : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी होण्यास परवानगी
Supreme Court Vinesh Phogat hearing
कुस्तीपटू विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.Pudhari
Published on
Updated on

Supreme Court on Vinesh Phogat

नवी दिल्‍ली : कुस्तीपटू विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games) निवड चाचणीत (Trials) सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. विनेशला चाचणीत भाग घेण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुस्ती महासंघाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला तात्पुरता दिलासा दिला असला, तरी तिच्या सहभागाला आव्हान देणाऱ्या कुस्ती महासंघाच्या (WFI) याचिकेवर तिचे उत्तरही मागवले आहे.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाला WFIने दिले होते आव्‍हान

भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली होती. तीन वेळची ऑलिम्पियन असलेल्या विनेश फोगाटने कुस्ती महासंघाच्या अधिकृत धोरणातील पात्रतेचे निकष पूर्ण केले नसतानाही, तिला चाचणीत उतरू देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला या याचिकेत आव्हान देण्यात आले होते.

Supreme Court Vinesh Phogat hearing
Vinesh Phogat Disqualification Case : विनेश फोगटला अपात्र ठरवल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाकडून भारतीय कुस्ती महासंघाची कानउघाडणी

काय म्‍हणाले होते उच्‍च न्‍यायालय?

गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, "मातृत्व हा कोणताही 'अपात्रतेचा' निकष असू शकत नाही किंवा व्यावसायिक संधी नाकारण्याचे ते कारण ठरू शकत नाही." त्यानुसार न्यायालयाने कुस्ती महासंघाला ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत विनेशला सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते.

Supreme Court Vinesh Phogat hearing
Vinesh Phogat | 'ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या ६ महिलांमध्ये मी सुद्धा'; विनेश फोगटचा खळबळजनक खुलासा

"तिने देशाची मान उंचावली आहे" : सर्वोच्च न्यायालय

संबंधित व्‍यक्‍ती कोणी सामान्‍य असती तर परिस्थिती वेगळी असती. पण तिने (विनेशने) देशाची मान उंचावली आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने केली. आज या टप्प्यावर, उच्च न्यायालयाने आदेश जारी केल्यानंतर (विनेशच्या) आशा आणि अपेक्षा वाढल्या आहेत. अशा वेळी 'आम्ही काही करू शकत नाही, त्यामुळे तू घरी परत जा' असे तिला सांगणे योग्य ठरणार नाही. हे आम्ही तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगत आहोत."

Supreme Court Vinesh Phogat hearing
Supreme Court | 'भारतीय लष्करातील महिला अधिकार्‍यांना आता कायमस्वरूपी 'कमिशन' : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा ऐतिहासिक निकाल

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयाची चिंता

सर्वोच्च न्यायालयाने विनेशला या चाचणीत खेळण्याची परवानगी दिली असली, तरी कुस्ती महासंघाच्या मुख्य याचिकेवर पुढील आठवड्यात सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. अशा क्रीडाविषयक बाबींमध्ये वारंवार आणि तातडीने होणारा न्यायालयीन हस्तक्षेप अडचणीचा ठरू शकतो, असे खंडपीठाने नमूद केले.

हे काही वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश नाहीत

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नरसिंहा यांनी तोंडी टिप्पणी करताना म्हटले की, "हे काही वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश नाहीत; हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्र आहे. न्यायालये अशा प्रकारे हस्तक्षेप करून संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत करू शकत नाहीत." सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला तात्पुरता दिलासा दिला असला, तरी तिच्या सहभागाला आव्हान देणाऱ्या कुस्ती महासंघाच्या (WFI) याचिकेवर तिचे उत्तरही मागवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news