Vinesh Phogat | 'ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या ६ महिलांमध्ये मी सुद्धा'; विनेश फोगटचा खळबळजनक खुलासा

आज काही विशिष्ट परिस्थितींमुळे मला सर्वांना काहीतरी सांगायचे आहे
Vinesh Phogat’s Big Revelation in Harassment Case Against Brij Bhushan Singh
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये स्वतःचाही समावेश असल्याचे विनेश फोगटने रविवारी जाहीर केले.Pudhari
Published on
Updated on

Vinesh Phogat’s Big Revelation in Harassment Case Against Brij Bhushan Singh

नवी दिल्ली : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने रविवारी एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये स्वतःचाही समावेश असल्याचे तिने जाहीर केले आहे.ब्रिजभूषण यांच्यावरील खटला सध्या न्यायालयात सुरू असून साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विनेशने सांगितले की, तिने यापूर्वी आपली ओळख गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तिला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ द्यायची होती.

ओळख जाहीर करण्याचे कारण

सोशल मीडियावर आज (दि. ३ मे) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनेश म्हणाली, "सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीडितेची ओळख उघड केली जाऊ नये, कारण हा त्यांच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा विषय असतो; पण आज काही विशिष्ट परिस्थितींमुळे मला सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. खटला प्रलंबित असताना मला बोलायचे नव्हते... पण मी हे सांगू इच्छिते की, ज्या सहा पीडितांनी तक्रार दाखल केली होती, त्यापैकी मी एक आहे आणि आमची साक्ष अद्याप सुरू आहे." दरम्‍यान, २०२३ मध्ये दिल्‍लीतील जंतरमंतर येथे ब्रिजभूषण यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनातील मुख्‍य चेहरा विनेश फोगट होती.

Vinesh Phogat’s Big Revelation in Harassment Case Against Brij Bhushan Singh
Mahavir Phogat : बृजभूषण सिंह यांना तातडीने अटक करा, महावीर फोगट यांची मागणी

गोंडा येथील चाचण्यांवर आक्षेप

विनेशने आता जाहीरपणे बोलण्याचा निर्णय घेण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रँकिंग स्पर्धा आणि चाचण्या (Trials) घेण्याचे ठरवले आहे. विनेशच्या मते, गोंडा हे ब्रिजभूषण यांच्या प्रभावाखालील क्षेत्र आहे. या चाचण्या त्यांच्या मालकीच्या एका खासगी कॉलेजमध्ये घेतल्या जात आहेत, ज्यामुळे खेळाडूंना न्याय मिळेल की नाही, अशी शंका तिने उपस्थित केली आहे.

Vinesh Phogat’s Big Revelation in Harassment Case Against Brij Bhushan Singh
Vinesh Phogat : आशियाई स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का; कुस्तीपटू विनेश फोगट स्पर्धेबाहेर

... तर याला भारत सरकार जबाबदार असेल

विनेशने भीती व्यक्त केली की, "जर नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धेदरम्यान मला किंवा माझ्या टीमला काही झाले, तर त्याला भारत सरकार जबाबदार असेल. स्पर्धा अशा ठिकाणी आयोजित केली जात आहे जिथे त्यांचा (ब्रिजभूषण) मोठा प्रभाव आहे. कोणता सामना कोण हाताळणार, किती गुण दिले जाणार, मॅट चेअरमन कोण असेल, या सर्व गोष्टींवर त्यांचे नियंत्रण असू शकते."

Vinesh Phogat’s Big Revelation in Harassment Case Against Brij Bhushan Singh
Iran: इराणमध्ये १९ वर्षीय कुस्तीपटूला फाशी; क्रीडा विश्वात खळबळ, नेमकं कारण काय?

अशा वातावरणात १०० टक्के कामगिरी करणे कठीण

सुमारे १८ महिन्यांनंतर पुनरागमन करत असलेल्या ३१ वर्षीय विनेशने सांगितले की, ती ५७ किलो वजनी गटात खेळणार आहे. मात्र, अशा वातावरणात १०० टक्के कामगिरी करणे कठीण असल्याचे म्‍हटलं आहे. "मी कोणतीही सवलत किंवा विशेष वागणूक मागत नाही. माझी इच्छा फक्त इतकीच आहे की निकालांमधून खेळाडूंच्या कष्टाचे प्रतिबिंब दिसावे. अशा वातावरणात खेळणे जिथे उपस्थित असलेले बहुतांश लोक त्यांच्याशी (ब्रिजभूषण) संबंधित असू शकतात, माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आणत आहे."

Vinesh Phogat’s Big Revelation in Harassment Case Against Brij Bhushan Singh
Harmanpreet Kaur: हरमनप्रीतनं आता कर्णधारपदावरून पायउतार व्हाव... माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य

सरकार केवळ प्रेक्षकाच्‍या भूमिकेत

विनेशने सरकार आणि क्रीडा मंत्रालयावरही निशाणा साधला. अधिकारी कोणतीही कारवाई करत नसून सरकार केवळ 'प्रेक्षक' म्हणून पाहत आहे आणि त्यांनी ब्रिजभूषण यांना मोकळे रान दिले आहे, असा आरोप तिने केला.२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीतून वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरल्यानंतर विनेशची ही पहिलीच स्पर्धा असेल. २०२३ मध्ये सुरू झालेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news