Vaibhav Sooryavanshi Controversy: ती चूक भोवणार... १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीवर अवघ्या चार सामन्यातच ICC करणार मोठी कारवाई?

Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Sooryavanshi ControversyPudhari
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Controversy: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आयसीसीच्या स्कॅनरखाली आहे. भारतीय अ संघ श्रीलंकेत ट्राय सिरिज खेळत आहे. या मालिकेत श्रीलंकेने भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. याच सामन्यात वैभव सूर्यवंशी एका वादग्रस्त घटनेत अडकला आहे. सामना सुरू असताना वैभवचा आणि श्रीलंकेच्या खेळाडूचा वाद झाला. या वादानंतर आता सामनाधिकारी प्रदीप जयप्रगाश हे आयसीसी कोड ऑफ कंडक्टनुसार वैभव सूर्यवंशीवर कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलचा 'पाटा' नाहिसा होताच वैभवच्या बॅटला लागलं ग्रहण; दमदार सुरूवातीनंतर फटके 'क्लिअर' का होत नाहीयेत?

सामन्यानंतर नेमकं काय झालं?

सुपर ओव्हरमध्ये भारतीय अ संघाला १७ धावा करायच्या होत्या. भारताला फक्त ९ धावाच करता आल्या. भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. वैभव सूर्यवंशीने सुपर ओव्हरमधील शेवटचे ३ चेंडू खेळले होते. त्याच्या समोर स्लिंगर अॅक्शन असलेला कगुथास मथुलन गोलंदाजी करत होता. त्याने ३ चेंडूत ६ धावा केल्या. त्यात एका चौकाराचा समावेश होता. मात्र वैभवला सामना काही जिंकून देता आला नाही.

या विजयानंतर श्रीलंकेचे खेळाडू मोठा जल्लोष करत होते. त्यावेळी कॅमेरा वैभव सूर्यवंशी मैदान सोडत असतानाची क्षणचित्रे टीपत होता. मात्र जाता जाता अचानक वैभवने आपला मार्ग बदलला आणि मथुलनकडे तो गेला. मथुलन वैभवला काही बोलला होता. त्यानंतर वैभव त्याच्यावर चाल करून गेला होता.

दरम्यान, श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलमबगे याने मध्यस्थी करत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. मात्र वैभव सूर्यवंशी त्याला धक्का देत असल्याचं दिसत आहे. हलमबगे देखील वैभवकडे येत होता. तेवढ्यात वरिष्ठ खेळाडू डिक्वेलाने मध्यस्थी केली अन् प्रकरण वाढू दिलं नाही.

Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Suryavanshi |पाकिस्‍तानमध्‍येही वैभव सूर्यवंशीचा 'दरारा'; क्रिकेट विश्लेषक थेट म्हणाला, "खुदा न खास्ता..."

आयसीसीचा नियम काय?

वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जो काही प्रकार झाला तो प्रकार हा आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल २.१२ अंतर्गत येतो. खेळाडूंनी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अंपायर, मॅच रेफ्री आणि इतर कोणत्याही व्यक्तीला आंतरराष्ट्रीय सामन्यावेळी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण. हा प्रकार मोडतो.

नियमानुसार खेळाडूने दुसऱ्या खेळाडूविरूद्ध किंवा अधिकाऱ्याविरूद्ध जर मुद्दाम, आक्रमकपणे आणि निष्काळजीपणे फिजिकल कॉन्टॅक्ट केला, अंगावर चालत आला धावत आला किंवा शोल्डरिंग केलं तर खेळाडू दोषी ठरतो.

आयसीसी अशा प्रकरणामध्ये अनेक फॅक्टर विचारात घेतं तसेच या गुन्ह्याचे गांभिर्य देखील लक्षात घेतं. जर खेळाडूला २४ महिन्यात ४ डीमेरीट पॉईंट मिळाले असतील तर त्या खेळाडूचे निलंबन देखील होऊ शकतं.

Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Sooryavanshi: पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभवकडून निराशा... दोन षटकातच मोहम्मद शिराजच्या जाळ्यात अडकला

सगळा फोकस सूर्यवंशीवर

सध्याच्या घडीला सामनाधिकारी प्रदीप जयप्रगाश यांनी कारवाई केल्याचे किंवा अधिकृत कोणती वॉर्निंग इशू केली असल्याची माहिती समोर आलेली नाही.

भारताचा सुपरओव्हरमध्ये पराभव झाल्यामुळं सर्वांच्याच भावना तीव्र होत्या. मात्र सुपर ओव्हरनंतर घडलेल्या ड्रामामुळं सगळा फोकस हा वैभव सूर्यवंशीवर कारवाई होणार का याकडे गेला.

logo
Pudhari News
pudhari.news