Tilak Varma T20 record : तिलक वर्माने केली रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी

नमन धीर, नितीश रेड्डीच्या साथीने टीम इंडियाचा विजय केला सुकर
Tilak Varma T20 record Rohit Sharma
तिलक वर्माच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला.Pudhari
Published on: 
Updated on: 

Tilak Varma T20 record Rohit Sharma : तिलक वर्माच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. या सामन्यात नमन धीर, नितीश रेड्डीच्या साथीने तिलक वर्माने टीम इंडियाचा विजय सुकर केलाच; त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पाठलागादरम्यान (run-chase) ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरीही केली.

तिलक वर्माने साकारली महत्त्वपूर्ण खेळी

भारताला सर्वात जास्त गरज होती, तेव्हाच तिलक वर्माने ही महत्त्वपूर्ण खेळी साकारली. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ११ व्या षटकापर्यंत भारताचे ४ फलंदाज ६९ धावांत बाद झाले होते. त्याच षटकात ७० धावा असताना अक्षर पटेल बाद झाल्यामुळे भारताला पाचवा धक्का बसला. अर्धा संघ तंबूत परतला होता. विजयासाठी ९ षटकांत १११ धावांची गरज होती. नमन धीर आणि नितीश रेड्डी यांच्या साथीने भारतीय उपकर्णधार तिलकने दोन अत्यंत महत्त्वाच्या भागीदारी रचत विजयात मोलाची भूमिका बजावली. तिलक २६ चेंडूंत ५१ धावा करून नाबाद राहिला; त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश होता. या खेळीसह त्याने 'हिटमॅन' रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Tilak Varma T20 record Rohit Sharma
Tilak Varma: तिलकला वाटलं बाउंड्रीच... क्रीझवर चालू लागला; क्षणात बेल्स उडाल्या! असा 'रन-आऊट' पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

रोहित शर्माच्‍या विक्रमाशी बरोबरी

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पाठलागादरम्यान ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची तिलक वर्माची ही चौथी वेळ आहे. भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा — ज्यांनी २०२४ टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली — त्यांनीही आपल्या कारकिर्दीत चार वेळा हा पराक्रम केला होता.

विराट कोहली अव्वल स्थानी

धावांच्या यशस्वी पाठलाग करण्याच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहली आणि इतर खेळाडूंमध्ये मोठी तफावत आहे; त्याने भारताच्या यशस्वी पाठलागादरम्यान ११ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे तो प्रत्येक वेळी नाबाद राहिला आहे.

Tilak Varma T20 record Rohit Sharma
Tilak Varma Century : संकटकाळात कॅप्टन तिलक वर्माची शतकी खेळी! श्रेयससोबत १७५ धावांची भागीदारी, साउथ झोनला ९० धावांची आघाडी

सामन्यात काय घडलं?

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने ग्लेन फिलिप्स (७०) आणि बेव्हन जेकब्स (५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १८० धावांची भक्कम धावसंख्या उभारली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यात नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. मधल्या फळीतील फलंदाजांपैकी नमन धीरने ३१ धावा, अभिषेक शर्माने २७, संजू सॅमसनने १४ आणि अक्षर पटेलने ११ धावा केल्या. १५ व्या षटकात जेव्हा भारताची अवस्था ११२/६ अशी बिकट होती, यानंतर तिलक वर्मा आणि नितीश कुमार यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यात तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाचा (५१*) आणि नितीश कुमार रेड्डीसोबतच्या (२६*) सातव्या विकेटसाठी केलेल्या ६९ धावांच्या भागीदारीचा मोलाचा वाटा होता. सलग दुसर्‍या विजयामुळे भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news