Tilak Varma: तिलकला वाटलं बाउंड्रीच... क्रीझवर चालू लागला; क्षणात बेल्स उडाल्या! असा 'रन-आऊट' पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Tilak Varma run out IND vs WI : अक्षर पटेलसोबत झालेल्या गैरसमजामुळे हाकनाक विकेट गमावली

Tilak Varma run out IND vs WI
Pudhari
Published on: 
Updated on: 
Summary

भारत आणि वेस्ट इंडीज टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील १७ व्या षटकात घडलेल्या या विचित्र प्रकाराने मैदानावरील प्रेक्षकांनाही धक्का बसला.

Tilak Varma run out IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा विचित्र पद्धतीने आऊट झाला. या प्रकाराने मैदानातील खेळाडूही आश्चर्यचकित झाले. अक्षर पटेलसोबत झालेल्या गैरसमजामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.

तिलक वर्माला वाटलं बाउंड्रीच...

भारत आणि वेस्ट इंडीज टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील १७ व्या षटकात घडलेल्या या विचित्र प्रकाराने मैदानावरील प्रेक्षकांनाही धक्का बसला. या षटकात अक्षर पटेल फलंदाजी करत होता, तर गोलंदाजी गुडाकेश मोती करत होता. अक्षर पटेलने चेंडू 'डीप मिड-विकेट'च्या दिशेने मारला. बाउंड्रीजवळ असलेल्या वेस्ट इंडिजच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी डायव्ह मारली. मात्र, चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्या क्षेत्ररक्षकाचा स्पर्श बाउंड्रीच्या दोरीला (सीमेला) झाला असावा, असे अक्षर आणि तिलक यांना वाटले. चौकार मिळेल या अपेक्षेने दोन्ही फलंदाजांनी धावण्याचा वेग कमी केला आणि आपापल्या टोकाकडे आरामात चालू लागले.


Tilak Varma run out IND vs WI
Steve Smith : यशस्वी फील्डर..! स्टीव्ह स्मिथने द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत मोडला जो रूटचा ऐतिहासिक विक्रम

अंदाज चुकला... क्षणात बेल्स उडाल्या

त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला. अक्षर पटेल वेळेत आपल्या क्रीजपर्यंत पोहोचला, पण तिलक परतण्याआधीच क्षेत्ररक्षकाने बेल्स उडवल्या. चेंडूने बाउंड्री ओलांडली होती की नाही, हे ठरवण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसले की क्षेत्ररक्षकाने चेंडू बाउंड्रीपर्यंत पोहोचण्याआधीच अडवला होता. परिणामी, तिलकला आपली विकेट गमवावी लागली.

भारताने निर्णायक क्षणी विकेट गमावली

या सामन्यात भारताने निर्णायक क्षणी तिलकची विकेट गमावली. त्याने १६ चेंडूंचा सामना करत २८ धावा केल्या होत्या. संघाची धावसंख्या वेगाने वाढवण्यात त्याचे मोठे योगदान होते. मात्र, त्यांच्या एकाग्रतेतील त्रुटी संघाला महागात पडू शकली असती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २२३ धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्माने ३० चेंडूंत ६९ धावांची धडाकेबाज खेळी करत संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.


Tilak Varma run out IND vs WI
Sunil Gavaskar : रोहितच्या ९२ धावांवर सुनील गावस्‍कर नाराज!; 'हिटमॅन'च्या निवृत्तीबद्दल व्यक्त केली अनोखी इच्छा!

भारताची मालिकेत २-१ अशी आघाडी

विजयासाठी मिळालेल्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजचा १४ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, "गोलंदाजांमधील आत्मविश्वास हा आनंद देणारा ठरला. आमच्या चर्चेदरम्यान त्यांच्या योजनांमध्ये स्पष्टता होती. ते आव्हान स्वीकारण्यास सज्ज होते आणि त्यांच्याकडून आम्हाला नेमकी हीच अपेक्षा असते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news