Team India : मायदेशात धुळधाण, परदेशात शरणागती! टीम इंडियाच्या मागील 9 कसोटी सामन्यांची आकडेवारी धक्कादायक

सध्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाची अवस्था पाकिस्तानपेक्षाही वाईट असल्याचे चित्र आहे. सुरू झालेली सततची पराभवांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.
Team India won just 1 of their last 9 Tests
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघ विशेषतः कसोटी फॉरमॅटमध्ये सध्या केवळ स्थित्यंतराच्याच नव्हे, तर गंभीर संकटाच्या काळातूनही जात आहे. संघाच्या पराभवाची मालिका अशी सुरू झाली आहे की, ती थांबण्याचे नावच घेत नाहीये. सलग पराभवांमुळे संघाची स्थिती इतकी खालावली आहे की, विजय मिळवणे ही एक दूरची गोष्ट वाटू लागली आहे.

आकडेवारीवर नजर टाकल्यास, भारतीय संघाने आपल्या मागील 9 कसोटी सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. या निराशाजनक कामगिरीमुळे जगातील इतर संघ भारताच्या खूप पुढे निघून गेले आहेत, इतकेच नव्हे तर पाकिस्ताननेही या कालावधीत भारतापेक्षा जास्त सामने जिंकले आहेत.

Team India won just 1 of their last 9 Tests
ICC Test Rankings : शतकांचे बक्षीस! ICC क्रमवारीत पंत-डकेटचा बोलबाला, अनेक दिग्गजांची जागा धोक्यात
  • भारतीय कसोटी संघ स्थित्यंतर आणि संकट या दुहेरी काळातून जात आहे.

  • मागील 9 कसोटी सामन्यांपैकी भारताला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

  • तुलनात्मकदृष्ट्या पाकिस्ताननेही भारतापेक्षा अधिक सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंडकडून मायदेशातच सपाटून मार खाल्ला

भारतीय संघाच्या पराभवाची ही मालिका अलीकडची नाही. याची सुरुवात न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यापासून झाली होती. न्यूझीलंडचा संघ भारतात येऊन तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 3-0 असा सपशेल पराभव करेल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. मात्र, तसे घडले आणि त्यानंतर भारतीय संघ अद्याप विजयाच्या मार्गावर परतलेला नाही.

Team India won just 1 of their last 9 Tests
Ind Vs Eng | ओह लॉर्ड... भारत पराभूत! ‘रूट’ भारताच्या मुळावर!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात विजय

न्यूझीलंड मालिकेनंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने दमदार सुरुवात केली होती. यामुळे केवळ मालिका जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या नाहीत, तर भारतीय संघ पुन्हा एकदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळेल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, घडले मात्र याच्या अगदी उलट. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाला जणू दृष्ट लागली आणि त्यानंतर मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. एक सामना अनिर्णित राखण्यात यश आले, पण विजय संघापासून दूरच राहिला.

Team India won just 1 of their last 9 Tests
148 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच.. हॅरी ब्रूकच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

WTCच्या नव्या पर्वाचीही निराशाजनक सुरुवात

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वात तरी भारतीय संघ विजयाने सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती, पण येथेही पराभवच पदरी पडला. याचाच अर्थ, मागील 9 कसोटी सामन्यांत भारतीय संघ केवळ एकच सामना जिंकू शकला आहे. अशी दयनीय अवस्था इतर कोणत्याही प्रमुख संघाची नाही. पाकिस्ताननेदेखील भारतीय संघापेक्षा जास्त सामने जिंकले आहेत.

पाकिस्तानने मागील 9 पैकी तीन कसोटी सामने जिंकले

या कालावधीतील कामगिरीचा विचार केल्यास, दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यांनी आपल्या मागील 9 कसोटी सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाची स्थितीही फारशी चांगली नसली तरी, त्यांनी मागील 9 कसोटी सामन्यांपैकी तीन सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. याउलट, भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

Team India won just 1 of their last 9 Tests
IND vs ENG Test : हेडिंग्लेवर इंग्लंडचा महापराक्रम! डकेटच्या अर्धशतकाने टीम इंडिया बॅकफूटवर, 30 वर्षांत दुसऱ्यांदाच असा घडला चमत्कार

आता ही पराभवाची मालिका कधी संपुष्टात येते आणि भारतीय संघ पुन्हा विजयाच्या पटरीवर कधी परततो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टीम इंडियाच्या मागील 9 कसोटी सामन्यांचे निकाल: सविस्तर तपशील

1. न्यूझीलंडविरुद्ध (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024, मायदेशात)

भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरी खेळलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ही मालिका भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निराशाजनक कामगिरींपैकी एक मानली जाते.

  • पहिला कसोटी सामना (बेंगळुरू, 16-20 ऑक्टोबर 2024) : न्यूझीलंड 8 विकेट्सनी विजयी

  • दुसरा कसोटी सामना (पुणे, 24-26 ऑक्टोबर 2024) : न्यूझीलंड 113 धावांनी विजयी

  • तिसरा कसोटी सामना (मुंबई, 1-3 नोव्हेंबर 2024) : न्यूझीलंड 25 धावांनी विजयी

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत 1-3 असा पराभव पत्करला. पहिला सामना जिंकूनही भारताला मालिका गमवावी लागली.

पहिला कसोटी सामना (पर्थ, 22-25 नोव्हेंबर 2024) : भारत 295 धावांनी विजयी

दुसरा कसोटी सामना (अ‍ॅडलेड, 6-10 डिसेंबर 2024) : ऑस्ट्रेलिया 10 विकेट्सनी विजयी

तिसरा कसोटी सामना (ब्रिस्बेन, 14-18 डिसेंबर 2024) : सामना अनिर्णित (ड्रॉ)

चौथा कसोटी सामना (मेलबर्न, 26-30 डिसेंबर 2024) : ऑस्ट्रेलिया 184 धावांनी विजयी

पाचवा कसोटी सामना (सिडनी, 3-5 जानेवारी 2025) : ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी

3. इंग्लंडविरुद्ध (जून 2025, इंग्लंड दौरा) : सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. ज्यामुळे मागील 9 सामन्यांतील पराभवांची संख्या 7 वर पोहोचली.

पहिला कसोटी सामना (लीड्स, 20-24 जून 2025) : इंग्लंड 7 विकेट्सनी विजयी

एकूण आकडेवारी : मागील 9 कसोटी सामने

जिंकले : 1 (ऑस्ट्रेलियाविरुद्ध, पर्थ 2024)

अनिर्णित : 1 (ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ब्रिस्बेन 2024)

पराभव : 7 (न्यूझीलंडविरुद्ध 3, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3, इंग्लंडविरुद्ध 1)

इतर संघांची तुलनात्मक आकडेवारी

  • दक्षिण आफ्रिका : मागील 9 सामन्यांत 8 विजय, 1 पराभव.

  • पाकिस्तान : मागील 9 सामन्यांत 3 विजय, 4 पराभव, 2 अनिर्णित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news