IND Vs NAM Playing XI: गंभीरची डोकेदुखी वाढली; नामीबियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल, प्लेइंग 11 मध्ये कोण?

India vs Namibia Playing XI: T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या नामीबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्मा आणि ईशान किशनच्या फिटनेसवर अंतिम निर्णय बाकी आहे.
India vs Namibia Playing XI Updates
India vs Namibia Playing XI UpdatesPudhari
Published on
Updated on

India vs Namibia Playing XI Updates: T20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केल्यानंतर भारत आज नामीबिया विरुद्ध मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेला हरवल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र या दुसऱ्या सामन्याआधी प्लेइंग इलेव्हनबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह

युवा सलामीवीर अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचं सांगितलं जात आहे. टीम मॅनेजमेंट त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. सामना सुरू होण्याच्या अगदी आधीच तो खेळणार की नाही, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अभिषेक बाहेर राहिल्यास संजू सॅमसनला संधी मिळू शकते. संजू फलंदाजीसोबत विकेटकीपिंगही करतो, त्यामुळे संघाचा समतोल राखला जाऊ शकतो.

India vs Namibia Playing XI Updates
IND vs PAK Explained: भारत पाकिस्तान मॅचमुळे भारताला किती हजार कोटींचा फायदा होणार? एका सामन्याची किंमत किती?

ईशान किशनलाही दुखापतीचा फटका

सरावादरम्यान ईशान किशनच्या पायाला चेंडू लागला होता. हा चेंडू टाकला होता जसप्रीत बुमराहने. त्यानंतर ईशान काही वेळ अस्वस्थ झाला आणि फिजिओला मैदानात यावं लागलं. नंतर तो पुन्हा सराव करताना दिसला, पण त्याच्या फिटनेस बाबत अजून माहिती नाही. ईशानही बाहेर राहिल्यास ओपनिंग जोडी बदलावी लागू शकते.

बुमराहला विश्रांती मिळणार?

वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. मागील सामन्यात सिराज आणि अर्शदीप यांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे संघाकडे पर्याय उपलब्ध आहेत. मोठ्या सामन्यांसाठी बुमराहला फ्रेश ठेवण्याचा विचार मॅनेजमेंट करत आहे.

India vs Namibia Playing XI Updates
Abhishek Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल, सामन्याआधीच फिटनेसची चिंता

वॉशिंग्टन सुंदर ओपनिंगला?

जर वरच्या फळीत दोन खेळाडू उपलब्ध नसतील, तर टीम नवीन प्रयोग करू शकते. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरला ओपनिंगसाठी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय टॉसपूर्वीच घेण्यात येईल.

हा सामना भारतासाठी पॉईंट टेबलमध्ये वरचे स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे खेळाडूंचा फिटनेस आणि संघातील संतुलन या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिलं जाणार आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन / वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह

नामीबियाची संभाव्य प्लेइंग 11

लोरेन स्टीनकॅम्प, जान फ्रिलिंक, लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, झेन ग्रीन (विकेटकीपर), डायलन लीचर, रूबेन ट्रम्पेलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शोल्ट्झ, मॅक्स हेंगो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news