IND vs NAM LIVE Streaming: आज संध्याकाळी भारत विरुद्ध नामीबिया सामना; फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व माहिती

T20 World Cup 2026 IND vs NAM LIVE Streaming: टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आजभारत विरुद्ध नामीबिया यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतीलअरुण जेटली स्टेडियम येथे होणार आहे.
T20 World Cup 2026 IND vs NAM Live Streaming
T20 World Cup 2026 IND vs NAM Live Streaming Pudhari
Published on
Updated on

T20 World Cup 2026 IND vs NAM Live Streaming Details: T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आज भारत आपला दुसरा ग्रुप सामना नामीबिया विरुद्ध खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेला हरवत विजयी सुरुवात केली होती, तर नामीबियाला नेदरलँड्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना आज (12 फेब्रुवारी) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे होणार आहे.

सामना कधी सुरू होणार?

भारत–नामीबिया सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. टॉस 6:30 वाजता होणार आहे.

लाईव्ह सामना कुठे पाहायचा?

या सामन्याचं थेट प्रक्षेपण Star Sports Network वर पाहता येईल. ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.

टीममध्ये बदल होणार?

पोटाच्या संसर्गामुळे दोन दिवस रुग्णालयात असलेला अभिषेक शर्मा आज विश्रांती घेऊ शकतो. त्याच्या जागी ईशान किशनसोबत संजू सॅमसन ओपनिंग करू शकतो. चांगली बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यात परतण्याची शक्यता आहे. तो खेळल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावं लागू शकतं.

T20 World Cup 2026 IND vs NAM Live Streaming
Abhishek Sharma ची प्रकृती सुधारली; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, मैदानात उतरण्याबाबत सस्पेन्स कायम

भारताची आणि नामीबियाचा संघ

भारत: सूर्यकुमार यादव (C), इशान किशन (WK), अभिषेक शर्मा, टिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.

नामिबिया: गेरहार्ड इरास्मस (सी), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्ज, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डायलन लीचर, डब्ल्यूपी माईबर्ग, मैक्स हिंगो, राखीव: अलेक्झांडर वोल्शेंक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news