IND vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज, पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यावर भर

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्मा ताप-पोटदुखीने त्रस्त असल्याने संजू सॅमसनला संधी?
IND vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज, पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यावर भर
Published on
Updated on

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेता भारतीय संघ गुरुवारी (दि. 12) नामिबियाविरुद्ध सहज विजय संपादन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित असेल. अमेरिकेविरुद्ध सलामीच्या लढतीत फलंदाजीत काहीशी दमछाक झाल्यानंतर, फिरोजशाह कोटलाच्या फलंदाजीला पूरक अशा खेळपट्टीवर भारतीय फलंदाज धावांच्या आतषबाजीसाठी विशेष महत्त्वाकांक्षी असतील. मात्र, या सामन्याआधी सलामीवीर अभिषेक शर्माला पोटदुखीमुळे इस्पितळात दाखल करावे लागले असल्याने भारतीय गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

भारतीय संघाचा बहरातील सलामीवीर अभिषेक शर्माला पोटाचा संसर्ग आणि व्हायरल तापामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अभिषेकला आजच्या लढतीत विश्रांती देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, त्याच्या गैरहजेरीत अंतिम एकादशमध्ये संधी मिळाल्यास संजू सॅमसन याचा कसा लाभ घेऊ शकेल, हे पाहणे रंजक ठरेल. इशान किशन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने संजूला संघातले आपले स्थान टिकवण्यासाठी या संधीचे सोने करावेच लागेल.

IND vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज, पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यावर भर
IND vs PAK : ‘माझ्या अ‍ॅक्शनची चर्चा म्हणजे भारत घाबरला’; पाकच्या उस्मान तारिकचे टीम इंडियाला खुले आव्हान

नामिबियाच्या फलंदाजांसमोर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांच्या आक्रमक गोलंदाजीला तोंड देण्याचे खडतर आव्हान असेल. याशिवाय, फिरकी आघाडीची मुख्य धुरा वरुण चक्रवर्तीवर असेल. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार भारताचा साखळी फेरीतील प्रवास तुलनेने सोपा आहे. नामिबियाविरुद्धचा हा सामना म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वीची एक ‌‘सरावाची तालीम‌’ मानली जात आहे. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यास या सामन्यात आपल्या सर्व फलंदाजांना पुरेशी संधी देण्याचा भारताचा येथे प्रयत्न असेल.

IND vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज, पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यावर भर
ICC Ranking : अभिषेक शर्माचं 'किंग'पद धोक्यात? साहिबजादा फरहानची तिसऱ्या स्थानी धडक; ICC रँकिंगचा रणसंग्राम पेटला

संभाव्य संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा/संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग.

नामिबिया : गेरहार्ड एरास्मस (कर्णधार), जेसी बाल्ट, झेन ग्रीन (यष्टिरक्षक), मलान क्रुगर, डिलन लीचर, लॉरेन स्टीनकॅम्प, जान फ्रिलिंक, निकोल लॉफ्टी-ईटन, विल्यम मायबर्ग, जेजे स्मिट, जॅक ब्रासेल, मॅक्स हाईंगो, बर्नार्ड शोल्टझ, बेन शिकोंगो, रुबेन ट्रम्पलमन.

IND vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज, पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यावर भर
T20 World Cup 2026 : संजू सॅमसनचे नशीब पुन्हा पालटणार, टी-२० विश्वचषक सामन्यासाठी देणार सलामी

नामिबियाच्या पहिल्या 6 फलंदाजात केवळ एकाचाच स्ट्राईक रेट शंभरपार!

जागतिक क्रिकेटमध्ये आजवर फारसा ठसा उमटवू न शकलेल्या नामिबिया संघातील पहिल्या 6 फलंदाजांत केवळ अष्टपैलू जेजे स्मिटच्या रुपाने एकाच फलंदाजाचा स्ट्राईकरेट शंभरपार राहिली आहे. स्मिटचा स्ट्राईक रेट 140 इतका असून यापूर्वी नामिबियाचा हाच संघ भारत ‌‘अ‌’ विरुद्ध वर्ल्डकपच्या सराव सामन्यात 100 धावांही करू शकला नव्हता, हे येथे लक्षवेधी आहे.

विजयाबरोबरच रनरेट सुधारण्यावरही भर देणार

नामिबियाच्या संघाने यापूर्वी नेदरलँडविरुद्ध खराब कामगिरी केली होती, त्यामुळे भारतासारख्या बलाढ्य संघाला रोखणे त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरू शकते. भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी विशेष रणनीती आखली असून, केवळ विजय मिळवणे नव्हे तर त्यासह नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा करण्याचा भारताचा प्रयत्न असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news