T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयर्लंडचा खुर्दा, कांगारु 67 धावांनी विजयी

कर्णधार मिचेल मार्श मैदानात नसतानाही ऑस्ट्रेलियन संघाने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवत एकतर्फी विजय नोंदवला.
T20 World Cup 2026 AUS vs IRE Australia beat Ireland by 67 runs
Published on
Updated on

T20 World Cup 2026 AUS vs IRE Australia beat Ireland by 67 runs

कोलंबो : स्टोईनिस, रेनशॉ, जोश इंग्लिसची आक्रमक फटकेबाजी व एलिस-झाम्पा यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने येथील आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात तुलनेने दुबळ्या आयर्लंड संघाचा 67 धावांनी धुव्वा उडवला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 6 बाद 182 धावांपर्यंत मजल मारली तर प्रत्युत्तरात आयर्लंडचा डाव 16.5 षटकात सर्वबाद 115 धावांमध्येच खुर्दा झाला.

कर्णधार मिचेल मार्श मैदानात नसतानाही ऑस्ट्रेलियन संघाने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवत एकतर्फी विजय नोंदवला. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाने जोरदार फलंदाजी साकारली. मार्कस स्टोईनिसने 29 चेंडूत आक्रमक 45 धावांची खेळी केली. त्याला जोश इंग्लिस (17 चेंडूत 37) व मॅट रेनशॉ (33 चेंडूत 37) यांनी मोलाची साथ दिली.

T20 World Cup 2026 AUS vs IRE Australia beat Ireland by 67 runs
IND vs PAK : ‘माझ्या अ‍ॅक्शनची चर्चा म्हणजे भारत घाबरला’; पाकच्या उस्मान तारिकचे टीम इंडियाला खुले आव्हान

183 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार पॉल स्टर्लिंग पहिल्याच चेंडूवर ‌’रिटायर्ड हर्ट‌’ होऊन तंबूत परतला.

त्यानंतर नॅथन एलिसने आपल्या भेदक माऱ्याने आयर्लंडला सावरण्याची संधीच दिली नाही. त्याने पॉवरप्लेमध्येच तीन बळी घेत आयर्लंडला लागापाठ धक्के देण्यात काहीच कसर सोडली नाही. हॅरी टेक्टर (0) आणि रॉस ॲडायर (12) स्वस्तात बाद झाले.

T20 World Cup 2026 AUS vs IRE Australia beat Ireland by 67 runs
T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! टी-२० विश्वचषकात स्टीव्ह स्मिथची एन्ट्री

एलिसने 4 षटकांत12 धावांच्या बदल्यात 4 बळी टिपले. याशिवाय, झॅम्पानेही 23 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेत आपल्या टी-20 कारकिर्दीतील तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. आयर्लंडचा डाव 16.5 षटकांत अवघ्या 115 धावांत आटोपला.

T20 World Cup 2026 AUS vs IRE Australia beat Ireland by 67 runs
ICC Ranking : अभिषेक शर्माचं 'किंग'पद धोक्यात? साहिबजादा फरहानची तिसऱ्या स्थानी धडक; ICC रँकिंगचा रणसंग्राम पेटला

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : 20 षटकांत 182/6 (स्टॉइनिस 45, इंग्लिस 37)

आयर्लंड : 16.5 षटकांत सर्वबाद 115 (नॅथन एलिस 4/12, ॲडम झॅम्पा 4/23)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news