

suryakumar yadav chance to create new record in t20 asia cup 2025
टी-२० आशिया चषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. जर त्याने स्पर्धेत फक्त चार षटकार खेचले, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५० षटकार पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनेल.
भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध होणार आहे. नुकतीच संघाची धुरा सूर्याकुमारकडे सोपवण्यात आली असून, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातत्यपूर्ण उत्तम खेळ करत आहे.
सध्या सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४६ षटकार मारले आहेत. जर त्याने अगामी आशिया चषक स्पर्धेत चार षटकार मारले, तर तो १५० षटकारांचा टप्पा पार करेल. आतापर्यंत फक्त रोहित शर्माने भारतासाठी हा पराक्रम केला आहे. हिटमॅनच्या नावावर २०५ षटकार आहेत.
यासह, सूर्या ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (१४८ षटकार) आणि वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन (१४९ षटकार) यांनाही मागे टाकेल.
रोहित शर्मा : २०५ षटकार
मार्टिन गुप्टिल : १७३ षटकार
मुहम्मद वसीम : १६८ षटकार
जोस बटलर : १६० षटकार
निकोलस पूरन : १४९ षटकार
ग्लेन मॅक्सवेल : १४८ षटकार
सूर्यकुमार यादव : १४६ षटकार
सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ३६० डिग्री शैलीतील फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो. आतापर्यंत ८३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २५९८ धावा फटकावल्या आहेत. यात चार शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.