Suryakumar vs Tendulkar : सूर्यकुमार यादव मोडणार तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम! मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचल्याने मार्ग मोकळा

Suryakumar Yadav Record : सूर्या सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम कधीही मोडू शकतो. हा विक्रम सुमारे 15 वर्षे जुना असून अजूनही अबाधित आहे.
sachin tendulkar
Published on
Updated on

suryakumar yadav chance to break tendulkar's big record mumbai indians

आयपीएल 2025 मध्ये सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपत आहे. विशेष म्हणजे त्याने यंदाच्या हंगामातील प्रत्येक सामन्यात 25 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आता त्याच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा 15 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा विक्रम आहे, जो तो मोडण्याच्या अगदी पोहचला जवळ आहे.

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तेंडुकरचा हा विक्रम मोडणे सोपे झाले आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने हा विक्रम 2010 मध्ये केला होता, तेव्हापासून तो अबाधित आहे, पण आता 15 वर्षांनी तो मोडला जाईल असे दिसते.

sachin tendulkar
Mumbai Indians Top 2 Scenario : मुंबईचं टॉप-2 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न अधांतरी? 'या' 2 संघांचा मोठा अडथळा, जाणून घ्या समीकरण

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 2010 च्या आयपीएलमध्ये त्याने 15 सामन्यात 618 धावा केल्या. त्या वर्षी त्याने पाच अर्धशतके झळकावली. यादरम्यान, सचिनची सरासरी 47.53 होती आणि त्याने 132.61 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तेव्हापासून, कोणीही हा विक्रम मोडू शकलेले नाही. तथापि, 2023 च्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव त्याच्या खूप जवळ पोचला होता. त्या वर्षी, सूर्याने 16 सामन्यांमध्ये 605 धावा केल्या पण 618 पर्यंत पोहोचू शकला नाही.

sachin tendulkar
IPL Playoff साठी RCBने रचली मोठी चाल! कोहलीच्या संघात न्यूझीलंडच्या फलंदाजाची अचानक एन्ट्री

सूर्याला 36 धावांची गरज

या वर्षी सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्ससाठी 13 सामन्यांमध्ये 583 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 72.87 आहे तर जास्त स्ट्राईक रेट 170 पेक्षा जास्त आहे. लीग स्टेजच्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याला अजूनही 600 धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. तेंडुलकरला मागे टाकण्यासाठी त्याला फक्त 36 धावा हव्या आहेत, जे तो फक्त एका सामन्यात करू शकतो, परंतु जर त्याने धावा केल्या नाहीत, तर त्यानंतर पुढच्या सामन्यात त्याच्यासाठी ही संधी असेल.

sachin tendulkar
Suryakumar Yadav World Record : सूर्याचा टी-20 मध्ये विश्वविक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. त्याच्यापुढे फक्त दोन फलंदाज आहेत. हे दोन्ही फलंदाज गुजरात टायटन्सचे आहेत. यात साई सुदर्शन 617 धावा करून पहिल्या स्थानावर आहे आणि शुभमन गिल 601 धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या सर्व फलंदाजांचे संघ प्लेऑफमध्ये पोहचले आहेत, त्यामुळे त्यांना अधिक सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तथापि, संघ किती सामने खेळतील याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. सूर्यकुमार यादव सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news