IPL 2025 RCB Tim Seifert

IPL Playoff साठी RCBने रचली मोठी चाल! कोहलीच्या संघात न्यूझीलंडच्या फलंदाजाची अचानक एन्ट्री

RCB संघाने IPL 2025 च्या प्लेऑफ सामन्यापूर्वी एक मोठी चाल खेळली आहे. त्यांनी जेकब बेथेलच्या जागी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टिम सेफर्ट याचा संघात समावेश केला आहे.
Published on

IPL 2025 RCB squad changes New Zealand cricketer Tim Seifert replacement on Jacob Bethell

आयपीएल 2025 साठी चार प्लेऑफ संघ निश्चित झाले आहेत. आरसीबीने दहाव्यांदा प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघाच्या विदेशी खेळाडूंनीही आतापर्यंत लक्षवेधी खेळ केला आहे आणि संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तथापि, प्लेऑफपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. प्लेऑफ दरम्यान एक विदेशी स्टार मायदेशी परतणार आहे आणि आरसीबीने लगेचच त्याच्या जागा भरून काढत बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

आरसीबीने IPL 2025 च्या प्लेऑफ सामन्यांपूर्वी टिम सेफर्टला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. खरंतर, इंग्लंडचा जेकब बेथेल 24 मे पर्यंत आरसीबीसाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर न्यूझीलंडचा सेफर्ट त्याच्या जागी संघात सामील होईल. ही माहिती आरसीबीने अधिकृतपणे दिली आहे.

आयपीएल 2025च्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBने लीग टप्प्यातील 12 पैकी 8 सामने जिंकून प्लेऑफसाठी आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दरम्यान, त्यांचे लक्ष्य क्वालिफायर-1 खेळण्याचे असेल त्यामुळे कोहलीचा संघ अव्वल दोनमध्ये पोहचण्याचा अटोकाट प्रयत्न करेल.

IPL 2025 RCB Tim Seifert
IND vs ENG U19 : इंग्लंड दौऱ्यासाठी आयुष म्हात्रे कर्णधार, वैभव सूर्यवंशीचीही निवड; BCCI कडून संघ आणि वेळापत्रक जाहीर

आरसीबीला त्यांचा पुढचा सामना 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. यासामन्यासाठी बेथेल उपलब्ध असेल. यानंतर, आरसीबीला 27 मे रोजी एलएसजी विरुद्ध शेवटचा लीग स्टेज सामना खेळायचा आहे, तोपर्यंत सेफर्ट संघात सामील होईल.

IPL 2025 RCB Tim Seifert
Suryakumar Yadav World Record : सूर्याचा टी-20 मध्ये विश्वविक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज

अशी आहे सेफर्टची टी-20 कारकीर्द

बेंगळुरूने टिम सेफर्टला 2 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. या किवी फलंदाजाने आतापर्यंत एकूण 262 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 27.65 च्या सरासरीने आणि 133.07 च्या स्ट्राईक रेटने 5862 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 3 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 107 आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये 2 संघांसाठी 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 113.04 च्या स्ट्राईक रेटने 26 धावा केल्या आहेत.

IPL 2025 RCB Tim Seifert
Team India England Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? नवी तारीख आली समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news