Suryakumar Yadav World Record : सूर्याचा टी-20 मध्ये विश्वविक्रम! ‘असा’ पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज

Suryakumar Yadav World Record in T20s : सूर्यकुमार यादव हा एकाच वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 डावात 25 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
suryakumar yadav world record
Published on
Updated on

सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक नवा आणि महान विक्रम रचला आहे. अद्याप कोणत्याही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाने हे निश्चितच एकदा केले असले तरी आता सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये सूर्याला कदाचित मोठी खेळी करता आली नसेल, पण त्याने त्याच्या छोट्या आणि प्रभावी खेळीने एक विक्रम रचला आहे. कोणत्याही फलंदाजासाठी याची बरोबरी करणे सोपे नसेल.

आतापर्यंत टी-20 क्रिकेटच्या इतिहासात, टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग 13 डावांमध्ये 25 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 2019 ते 2020 या काळात हा पराक्रम केला होता, पण आता सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे. सूर्या एका वर्षात सर्वाधिक वेळा सलग 25 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

suryakumar yadav world record
Team India England Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? नवी तारीख आली समोर

सूर्यकुमार यादवने या वर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान 25 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी अशी कामगिरी 11 वेळा केली आहे.

suryakumar yadav world record
Vaibhav Suryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाका, पदार्पणाच्या हंगामात ठोकला विक्रमांचा उत्तुंग ‘षटकार’!

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 25 धावा काढताच सूर्यकुमार यादवने हा विक्रम रचला. आता जर सूर्यकुमार यादवने पुढच्या सामन्यात पुन्हा 25 धावा केल्या तर तो असा पराक्रम करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनेल.

विशेष म्हणजे यावर्षीच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव देखील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आहे. या रेसमध्ये सध्या साई सुदर्शन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 617 धावा केल्या आहेत, तर शुभमन गिल 601 धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण सूर्यकुमार यादव देखील त्याच्या मागे नाही. 600 धावांचा टप्पा पार करण्यासाठी सूर्याला आणखी काही सामन्यांमध्ये प्रभावी फलंदाजी करावी लागेल. जर सूर्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आली तर तो पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचण्याच्या स्थितीत असेल.

suryakumar yadav world record
CSK IPL 2025 : ‘पॉइंट टेबलचा तळ गाठणे हीच CSKची लायकी’, संघाचे प्रशिक्षक फ्लेमिंग भडकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news