MS Dhoni IPL Retirement : धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार? रैनाने उघड केले गुपित

आयपीएल 2025 मधील चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीनंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबतच्या शक्यतांना वेग आला आहे.
MS Dhoni IPL Retirement
Published on
Updated on

MS Dhoni IPL Retirement

चेन्नई : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. हा संघ 9 सामन्यांत फक्त 2 विजय आणि तब्बल 7 पराभवांसह यंदाच्या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे जेव्हा सीएसके संघ टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. संघाच्या या खराब कामगिरीसोबतच, दर हंगामाप्रमाणे यावेळीही महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची जोरात सुरू झाली आहे.

दरवेळीप्रमाणे, यावेळीही आयपीएल सुरू होताच, ही धोनीची शेवटची स्पर्धा असेल का, अशा चर्चा सुरू झाल्या. 42 वर्षीय धोनीचे वय आणि त्याची घसरती कामगिरी या वादाला खतपाणी घालत आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 18 व्या हंगामात तर धोनीने 9 सामन्यांमध्ये फक्त 140 धावा केल्या आहेत, तेही 28 च्या सरासरीने. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 30 आहे. या आकड्यामुळे धोनीच्या चाहत्यांची नक्कीच निराशा झाली आहे.

MS Dhoni IPL Retirement
CSK Performance IPL 2025 : ..तर धोनीचा विषय संपणार! चेन्नई सुपर किंग्जसाठी अजूनही आशेचा किरण?

सुरेश रैना काय म्हणाला?

दरम्यान, धोनीचा जवळचा मित्र आणि सीएसकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने या अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. रैनाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर जतीन सप्रू याच्याशी झालेल्या संभाषणात स्पष्टपणे सांगितले की धोनी अद्याप निवृत्त होण्याच्या मनःस्थितीत नाही आणि तो आयपीएल 2026 मध्येही खेळताना दिसेल. रैनाच्या या विधानामुळे धोनीला मैदानावर खेळताना पाहू इच्छिणाऱ्या लाखो चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

suresh raina big statement on csk and ms dhoni ipl future and retirement
MS Dhoni IPL Retirement
Virender Sehwag Criticizes CSK : चेन्नईच्या खेळाडूंना घरी जाण्याची घाई, सेहवागची बोचरी टीका

‘धोनी मेगा लिलावाचा भाग नव्हता’

सुरेश रैनाने केवळ धोनीच्या भविष्याबद्दलच नाही तर संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीवरही खुलासा केला. तो म्हणाला की, ‘यंदाच्या मेगा लिलावात धोनीची कोणतीही भूमिका दिसली नाही. तो या लिलावाचा भाग नसल्याचे दिसले. त्यातच सीएसके संघ व्यवस्थापन काही महत्त्वाचे खेळाडू खरेदी करण्यात अपयशी ठरले, ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर स्पष्टपणे दिसून येत आहे.’

‘थाला’चा प्रवास संपला

चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2025मधील प्रवास जवळजवळ संपुष्टात आला आहे. आता उर्वरित 5 सामन्यांमध्ये हा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी कसा खेळ करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी, धोनीचे चाहते निश्चितच आनंदी असतील की 'थाला'चा प्रवास अजून संपलेला नाही आणि तो पुढच्या वर्षीही पिवळ्या जर्सीमध्ये दिसेल.

MS Dhoni IPL Retirement
IPL 2025 मध्ये Mumbai Indians चे ‘चॅम्पियन’ होणे निश्चित... तयार होत आहे ‘हा’ रंजक योगायोग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news