CSK Performance IPL 2025 : ..तर धोनीचा विषय संपणार! चेन्नई सुपर किंग्जसाठी अजूनही आशेचा किरण?

सीएसकेने प्ले ऑफसाठी महत्त्वाची असलेली लढत गमावली असली तरी अजूनही ते स्पर्धेत बाद झालेले नाहीत.
MS Dhoni CSK Performance IPL 2025
Pudhari Photo
Published on
Updated on

चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला घरच्या मैदानावर आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानातील विजयानंतर त्यांनी चेपॉकच्या मैदानावर चौथा सामना गमावला आहे. 9 सामन्यांत फक्त 2 विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत 4 गुणांसह सर्वात तळाला आहे. सीएसकेने प्ले ऑफसाठी महत्त्वाची असलेली लढत गमावली असली तरी अजूनही ते स्पर्धेत बाद झालेले नाहीत. या पराभवासह स्वबळावर प्ले ऑफ गाठण्याची शक्यता संपली असली तरी जर-तरच्या समीकरणातून त्यांना एक शेवटची संधी असेल. जाणून घेऊयात ते कसे शक्य होईल, त्यासंदर्भातील सविस्तर माहिती...

प्ले ऑफ गाठण्यासाठी 16 ही मॅजिक फिगर

आयपीएलमध्ये प्ले ऑफ गाठण्यासाठी 16 ही मॅजिक फिगर आहे, पण बर्‍याचदा 14 गुणही एखाद्या संघासाठी प्ले ऑफचे दरवाजे उघडण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. त्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आधी उर्वरित 5 सामने जिंकावे लागतील. एवढेच नाही तर धावगतीही उत्तम ठेवावी लागेल. या दोन गोष्टींसह ते 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, एवढे सगळे केल्यावर त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

MS Dhoni CSK Performance IPL 2025
CSK Performance IPL 2025 : ‘मेगालिलावात माती खाल्ली’ : मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंगची कबुली

एक सामना गमावला तर तिथेच विषय संपणार!

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने इथून पुढचा एक जरी सामना गमावला तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा तिथेच संपेल. कारण उर्वरित सामने जिंकून ते 14 गुणांपर्यंतही पोहोचू शकणार नाहीत. आयपीएलमध्ये 10 संघ असताना 14 गुणांसह प्ले ऑफ गाठण्याचा पराक्रम फक्त एका संघाने करून दाखवला आहे. आरसीबीच्या संघाने गत हंगामात 7 पैकी 14 सामन्यांत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये एंट्री मारली होती. त्याच पॅटर्नसह सीएसकेला एक संधी असेल, पण त्यासाठी आधी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. सध्याची चेन्नईची अवस्था बघता हेही त्यांना शक्य होईल, असे वाटत नाही.

MS Dhoni CSK Performance IPL 2025
Virender Sehwag Criticizes CSK : चेन्नईच्या खेळाडूंना घरी जाण्याची घाई, सेहवागची बोचरी टीका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news