Sunil Gavaskar: एक सेकंदही अशा खेळाडूंवर वाया घालवू नका; सुनील गावस्कर आता कोणत्या खेळाडूंवर संतापले?

Sunil Gavaskar IPL 2026 Controversy: IPL 2026पूर्वी काही परदेशी खेळाडू फक्त काही सामने खेळत असल्याने सुनील गावस्कर संतापले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर जोश इंगलिस सर्वात चर्चेत आहे.
Sunil Gavaskar IPL 2026 Controversy
Sunil Gavaskar IPL 2026 ControversyPudhari
Published on
Updated on

Sunil Gavaskar IPL 2026 Controversy: IPL ही जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट लीग मानली जाते. या लीगला पुरेसा मान-सन्मान न देणाऱ्या परदेशी खेळाडूंवर आता भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

आगामी IPL 2026 साठी काही परदेशी खेळाडू फक्त काही मॅच खेळणार असल्यामुळे गावस्कर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. गावस्कर यांनी त्यांच्या कॉलममध्ये लिहिलं “IPLचा आदर न करणाऱ्या आणि संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसणाऱ्या कोणत्याही खेळाडूवर लिलावाचा एक सेकंदही वाया घालवू नका.”

Sunil Gavaskar IPL 2026 Controversy
Babri Masjid: नोटा मोजण्यासाठी मशीन, 30 जणांची टीम; ‘बाबरी मस्जिद’ उभारण्यासाठी किती निधी जमा झाला? पाहा व्हिडिओ

IPL 2026 च्या लिलावापूर्वी काही परदेशी खेळाडूंनी BCCI ला कळवलं की ते संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहणार नाहीत. यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर जोश इंगलिस सर्वात चर्चेत आहे. त्याच्या लग्नामुळे तो फक्त काही आठवडे खेळू शकणार असल्याचं त्याने नमूद केलं आहे.

BCCI कडे उपलब्धतेची माहिती देणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये—

  • एश्टन एगर (ऑस्ट्रेलिया) – 65%

  • विलियम सदरलंड (ऑस्ट्रेलिया) – 80%

  • अ‍ॅडम मिल्ने (न्यूझीलंड) – 95%

  • रायली रुसो (द. आफ्रिका) – फक्त 20%

या खेळाडूंनी पूर्ण सीझन न खेळण्याचे संकेत दिल्यानंतरच गावस्कर आक्रमक झाले. यावर गावस्कर म्हणाले “नेशनल ड्युटी सोडून इतर कारणांमुळे IPLचे महत्त्व कमी करणाऱ्यांना लिलावात स्थान देण्याची आवश्यकता नाही.”

Sunil Gavaskar IPL 2026 Controversy
Bigg Boss 19 Winner Prize Money: बिग बॉस 19 विजेता जाहीर; गौरव खन्नाने मारली बाजी, ट्रॉफीसह किती पैसे मिळाले?

इंगलिसला पंजाब किंग्सने का रिलीज केले?

2025 मध्ये इंगलिस पंजाब किंग्ससाठी खेळला. परंतु त्याची मर्यादित उपलब्धता पाहून फ्रँचायझीनं त्याला रिलीज केलं. तरीही त्याने IPL 2026 लिलावासाठी ₹2 कोटी बेस प्राइस ठेवून नोंदणी केली आहे. IPL 2026 चा लिलाव सलग तिसऱ्यांदा परदेशात आयोजित होत आहे. 16 डिसेंबर रोजी अबू धाबीमध्ये लिलाव पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news