

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna Prize Money Revealed: टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ 15 आठवड्यांच्या धमाकेदार प्रवासानंतर 7 डिसेंबरला संपला. सलमान खानने अखेर विजेत्याचे नाव घोषित केले आणि या सीजनचा विजेता ठरला गौरव खन्ना. आपल्या शांत, संयमी आणि स्मार्ट खेळाने गौरवने प्रेक्षकांची मने जिंकली होती. फिनालेमध्ये गौरवला ट्रॉफीसोबत मोठी रक्कमही देण्यात आली आहे.
या सीजनचा विजेता ठरल्याबद्दल गौरव खन्नाला ₹50 लाखांची प्राईज मनी आणि बिग बॉस 19 ची ट्रॉफी देण्यात आली. 2006 मध्ये ‘बिग बॉस’ची सुरुवात झाल्यापासून विजेत्याला प्राईज मनी दिली जात आहे. पहिल्या सीजनमध्ये राहुल रॉय यांना तब्बल ₹1 कोटी रुपये मिळाले होते, परंतु पुढच्या सिझनमध्ये ही रक्कम कमी होत गेली आणि गेल्या तीनही सीजनमध्ये विजेत्याला 50 लाख रुपयेच मिळत आहेत.
बिग बॉस 17 विजेता – मुनव्वर फारुकी (₹50 लाख)
बिग बॉस 18 विजेता – करणवीर मेहरा (₹50 लाख)
बिग बॉस 19 विजेता – गौरव खन्ना (₹50 लाख)
गौरव खन्नाने अंतिम फेरीत फरहानाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
या सीजनचे टॉप-5 स्पर्धक होते:
गौरव खन्ना (विजेता)
फरहाना (रनर-अप)
अमाल मलिक
तान्या मित्तल
प्रणित मोरे
फिनालेनंतर सोशल मीडियावर गौरवचे नाव जोरदार ट्रेंड होत आहे आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
‘बिग बॉस’मध्ये प्रेक्षकांच्या मतांवर विजेता निवडला जातो.
आठवड्याला सर्वात कमी मत मिळालेला स्पर्धक बाहेर पडतो.
शेवटी टॉप-5, त्यातून टॉप-2 ठरतात.
आणि अंतिम फेरीत सर्वाधिक मत मिळालेला स्पर्धक विजेता बनतो.