

Babri Masjid Donation in Bengal: पश्चिम बंगालचे निलंबित TMC आमदार हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये अयोध्येतील बाबरी विध्वंसाच्या धर्तीवर नवीन ‘बाबरी मस्जिद’ची पायाभरणी केली आहे. यामुळे बंगालमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. हुमायूं कबीर यांनी सांगितले की. मुस्लीम समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि मस्जिद बांधण्यासाठी स्वतःहून निधी जमा करत आहे.
हुमायूं कबीर यांनी त्यांच्या फेसबुकवर मस्जिद बांधकामासाठी जमा झालेल्या निधीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत—
नोटांनी भरलेले 11 बॉक्स
नोटा मोजण्यासाठी कामात गुंतलेले 30 लोक
नोटा मोजणाऱ्या मशीनचा वापर
संपूर्ण प्रक्रिया CCTV देखरेखीखाली चालू असल्याचे दाखवण्यात आले आहे
कबीर म्हणाले की त्यांच्या बँक खात्यात QR कोडद्वारे तब्बल 93 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यांनी आरोपांना उत्तर देताना सांगितले, “लोक म्हणतात मी BJP कडून पैसे घेतो. म्हणूनच हा LIVE पैसे मोजणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. मस्जिद फक्त जनतेच्या पैशांतूनच उभी राहणार आहे.”
TMC मधून बाहेर पडल्यानंतर कबीर यांनी आता स्वतंत्र राजकीय पक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले—
22 डिसेंबरला नवी पार्टी जाहीर करणार
135 जागांवर उमेदवार उतरवण्याचा विचार आहे
AIMIM सोबत चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे
“मी बंगाल निवडणुकीत गेम-चेंजर ठरणार आहे,” असे हुमायूं कबीर यांचा दावा आहे
पण AIMIM किंवा असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या दाव्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘बाबरी मस्जिद’ मोहिमेमुळे मुर्शिदाबादसह संपूर्ण बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की, कबीर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. TMC च्या मते, कबीर यांचे काम पक्षविरोधी आणि स्वार्थी आहे. कबीर यांनी सांगितलं की, हा संकल्प संपूर्ण मुस्लीम समाजाचा आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही.