Jesus De Miguel Death: सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, खेळाडूला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान ३० वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

Jesus De Miguel Death: स्पेनमधील फुटबॉल सामन्यादरम्यान गोलरक्षकासोबत झालेल्या भीषण धडकेत टेनेरिफचा ३० वर्षीय खेळाडू जीझस डी मिगेल गंभीर जखमी झाला होता.
Jesus De Miguel Death
Jesus De Miguel DeathPudhari
Published on: 
Updated on: 

Jesus De Miguel Death: स्पेनमधील फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या एका भीषण घटनेने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. गोलकीपरसोबत झालेल्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या टेनेरिफ संघाचा ३० वर्षीय फुटबॉलपटू जीझस डी मिगेल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.

नेमकी घटना काय?

स्पेनमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल सामन्यात सीडी टेनेरिफ आणि एफसी अँडोरा हे दोन संघ आमनेसामने होते. सामना २-२ अशा बरोबरीत सुरू होता. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात एफसी अँडोराचा गोलकीपर जीझस ओवोनो बॉल अडवण्यासाठी गोलपोस्ट सोडून मैदानाच्या मध्यभागी धावला. याच वेळी त्याची टेनेरिफचा स्ट्रायकर जीझस डी मिगेल याच्याशी जोरदार धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की डी मिगेल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. स्पॅनिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी त्याचे हृदय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश आले होते.

अखेर मंगळवारी सकाळी त्याची प्रकृती आणखी खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. टेनेरिफ क्लबने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून याची माहिती दिली. क्लबच्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) त्याने अखेरचा श्वास घेतला.

या अपघातानंतर सामन्यात मोठा गोंधळ झाला. रेफ्रीने एफसी अँडोराचा गोलकीपर जीझस ओवोनो याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवले. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला.

Jesus De Miguel Death
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी जैस्वालचे स्फोटक शतक; साई सुदर्शन अपयशी, देवदत्त पडिक्कल भोपळाही न फोडता बाद

फुटबॉल विश्वातून श्रद्धांजली

जीझस डी मिगेलच्या मृत्यूने स्पेनमधील फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसला आहे. एफसी अँडोराचा प्रमुख भागधारक जेरार्ड पिके यानेही सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केले. "ही बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. जीझस, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्या आत्म्यास शांती लाभो," अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

Jesus De Miguel Death
Team India World Record : सिक्सरकिंग टीम इंडिया! एकाच वर्षात ४०० षटकारांचा जागतिक विक्रम; असा पराक्रम करणारा भारत पहिलाच संघ

रिअल माद्रिद, बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद यांसारख्या स्पेनमधील नामांकित फुटबॉल क्लबनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले. स्पॅनिश फुटबॉल महासंघानेदेखील दुःख व्यक्त केले आहे. फुटबॉल महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले की, "या दुःखद बातमीने आम्ही हादरलो आहोत. जीझस डी मिगेलच्या निधनाबद्दल आम्ही मनापासून दुःख व्यक्त करतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.