Sourav Ganguly Death Threat: पहिलं पत्र गांभिऱ्यानं घेतलं नाही... दुसरं आल्यावर सौरव गांगुलीची पोलीसांकडे धाव; तपासाची चक्रे फिरली

Sourav Ganguly Death Threat
Sourav Ganguly Death Threatpudhari
Published on
Updated on

Sourav Ganguly Death Threat: भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीला अनेक दिवसांपासून जिवे मारण्याची धमकी येत आहे. गेल्या काही महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. त्याला आलेल्या पत्रात सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

Sourav Ganguly Death Threat
Sourav Ganguly : सौरव गांगुलीला वाढदिवसाचे खास गिफ्ट, 'ICC हॉल ऑफ फेम'मध्ये एंट्री

सहा महिन्यापूर्वीही आलं होतं पत्र

सौरव गांगुली हा सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्याने दक्षिण कोलकाताच्या ठाकूरपुकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्याने त्याला आलेल्या दोन धमकीचे पत्र पोलिसांना दिली आहेत.

सौरव गांगुलीला सहा महिन्यापूर्वी धमकीचे पत्र दिले होते. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सौरव गांगुलीच्या मॅनेजरने एक पत्र सहा महिन्यापूर्वी आलं असल्याचं सांगितलं. सुरूवातीला आम्ही या धमकीच्या पत्राकडे फार गांभीर्याने पाहिलं नाही.

Sourav Ganguly Death Threat
Sourav Ganguly Biopic: 'दादा'च्या भूमिकेत राजकुमार राव; सौरव गांगुलीच्या बायोपिकचा फर्स्ट लुक समोर, रिलीज डेटही जाहीर

पत्नीसह जवळच्या व्यक्तीनाही धोका

मात्र ज्यावेळी सोमवारी दुसरं पत्र ऑफिसमध्ये आलं त्यावेळी सौरव गांगुली आणि त्यांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी देण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी आता तपास सुरू केला असून हे पत्र कोणी पाठवलं आहे आणि त्याचा यामागचा ताय उद्येश आहे याचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, 'आम्ही ही तक्रार गांभिर्याने घेतली असून आम्ही तपास सुरू केला आहे. आम्ही पत्राची तपासणी करत आहोत. त्याचा सोर्स, कुरिअरचा मागोवा घेत आहोत. आम्ही पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहोत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news