Asian Games 2026 : अभिमानास्पद..! कोल्हापूरच्या सोनम मस्करची नेमबाजीत रौप्यपदकाला गवसणी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पहिल्या पदकावर मोहोर
Sonam Maskar Asian Games 2026 silver medal
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्करने रौप्यपदकावर मोहोर उमटवली आहे.Pudhari
Published on
Updated on
Summary

सोनम मस्करने आपल्या सहकारी खेळाडू एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा कोचालुमकाल विनोद यांच्यासह रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.

Sonam Maskar Asian Games 2026 silver medal : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्करने रौप्यपदकावर मोहोर उमटवली आहे. भारताने १८९८.० च्या एकत्रित गुणांसह सांघिक रौप्यपदक जिंकले. मस्करने ६३४.१ गुणांसह संघाचे नेतृत्व केले आणि पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवले. एलावेनिल ६३३.५ गुणांसह सातव्या स्थानावर पात्र ठरली, तर विदर्साने ६३०.४ गुण मिळवून वैयक्तिकरित्या १२ वा क्रमांक पटकावला; या कामगिरीमुळे भारताला दुसरे स्थान मिळाले. मस्करने आपल्या सहकारी खेळाडू एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा कोचालुमकाल विनोद यांच्यासह रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.

मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी जमीन विकली

सोनम मस्कर हिचे वडील उत्तम मस्कर यांनी सोनमच्या रायफलसाठी आपली जमीन विकली होती. वडिलांनी केलेल्या त्याग आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आज सोनम मैदानात उतरली. आपल्या लक्ष्यावर अचूक नेम साधत तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

Sonam Maskar Asian Games 2026 silver medal
Asian Games 2026 India vs Bangladesh : बांगलादेशचा धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाची दिमाखात अंतिम फेरीत धडक

पालकांना समर्पित केले रौप्य पदक

नेमबाज सोनम मस्करने आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक आपल्या पालकांना समर्पित केले आहे. तिने आपल्या कुटुंबीयांसह प्रायोजकांचे, फेडरेशनचे व 'स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया'चे (SAI) त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानले. 'एएनआय'शी (ANI) बोलताना सोनम म्हणाली की, ही कामगिरी तिच्यासाठी आणि देशासाठी एक विशेष क्षण आहे. "सर्वप्रथम, मला खूप छान वाटत आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तसेच, माझे प्रायोजक, फेडरेशन, 'साई' (SAI) आणि हे पदक जिंकण्यासाठी मला ज्यांनी ज्यांनी साथ दिली, त्या सर्वांचे मी आभार मानते," असे सोनमने 'एएनआय'ला सांगितले.

Sonam Maskar Asian Games 2026 silver medal
Smriti Mandhana | स्मृती मानधनाने रचला इतिहास! महिला T20 क्रिकेटमध्ये नोंदवला नवा 'विश्वविक्रम'

नेमबाजीचा प्रवास २०१९ पासून सुरु

खेळातील आपल्या प्रवासाची आठवण सांगताना सोनम म्हणाली की, २०१९ मध्ये महाविद्यालयीन काळात उपलब्ध असलेल्या मर्यादित क्रीडा पर्यायांचा विचार केल्यानंतर तिने रायफल शूटिंगला सुरुवात केली. त्यावेळी रायफल शूटिंग, तिरंदाजी, बॉक्सिंग आणि ज्युडो असे केवळ चारच खेळ उपलब्ध होते. "मला बॉक्सिंग किंवा ज्युडोमध्ये रस नव्हता आणि तिरंदाजीचा प्रयत्न मी केवळ काही दिवसच केला. पण त्यानंतर मला रायफल शूटिंगमध्ये रस निर्माण झाला. लवकरच मी एका स्पर्धेत पदक जिंकले. यामुळे माझी आवड अधिकच वाढली. या खेळात मी काहीतरी साध्य करू शकते. अशा प्रकारे माझा प्रवास सुरू झाला," असे ती म्हणाली.

अनेक अडचणींवर मात करत आई-वडिलांनी दिली साथ

अनेक अडचणी आणि कठीण प्रसंगांतून जात असतानाही माझ्या आई-वडिलांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. "त्यांनी मला साथ दिली नसती, तर आज मी इथे उभी राहिले असते असे मला वाटत नाही," असे सोनम म्हणाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news