Smriti Mandhana | स्मृती मानधनाने रचला इतिहास! महिला T20 क्रिकेटमध्ये नोंदवला नवा 'विश्वविक्रम'

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातील कामगिरीने ठरली T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज
Smriti Mandhana world record T20I runs
Smriti Mandhana file photo
Published on
Updated on

Smriti Mandhana world record T20I runs : महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आता स्मृती मानधना अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यादरम्यान, भारतीय सलामीवीर मंधानाने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत हा टप्पा गाठला आहे.

महिला क्रिकेटच्या T20 इतिहासात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज

बेट्सला मागे टाकण्यासाठी स्मृती मानधनाला केवळ सात धावांची गरज होती. आजच्या सामन्यात तिने तिसऱ्या षटकात एका शानदार चौकारासह ही कामगिरी पूर्ण केली. तिने भारताला सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धेतही स्मृतीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेतील ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. तिने या स्‍पर्धेत एकूण २१३ धावा केल्या. हाँगकाँग-चीनविरुद्ध शतकही झळकावले होते. आता स्मृती मानधना महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे.

Smriti Mandhana world record T20I runs
Smriti Mandhana: स्मृती मानधना नॉनव्हेज खात नाही, वयाच्या ३०व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; जाणून घ्या तिचा डाएट आणि वर्कआउट

महिलांच्या T20I मध्ये फलंदाजाद्वारे सर्वाधिक धावा

  • ४७६१* - स्मृती मानधना (भारत)*

  • ४७५८ - सुझी बेट्स (न्यूझीलंड)

  • ४२८७ - हरमनप्रीत कौर (भारत)

Smriti Mandhana world record T20I runs
Smriti Mandhana ची वादळी फटकेबाजी; चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाला मिळवून दिला दणदणीत विजय

चौकार लगावत विक्रमीला गवसणी

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाने पहिल्याच षटकात चौकार मारून सुरुवात केली. मात्र, त्या चौकारानंतर तिने फलंदाजीची धुरा शफाली वर्माकडे सोपवली. बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे धावा करण्यास वाव दिला. तिसऱ्या षटकात स्मृती मानधनाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सलग दोन चौकार फटकावले. त्यातील एका चौकाराने तिने विश्‍वविक्रमाला गवसणी घातली. यानंतर तिने मुक्तपणे फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पॉवरप्ले दरम्यान १९ चेंडूंत ३७ धावा करून मंधाना बाद झाली; पण टीम इंडियाला दमदार सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी तिने अचूकपणे पार पाडली.

Smriti Mandhana world record T20I runs
Smriti Mandhana 50 @ Lords : जगातली पहिली... स्मृती मानधना ठरली ‘लॉर्ड्स’वर कसोटी अर्धशतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू

T20I क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही गाठला

मंधानाने दोन षटकार ठोकले आणि भारताने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. या षटकारांमुळे मंधानाने महिलांच्या T20I क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला; यासह सोफी डिव्हाईन, डिएंड्रा डॉटिन आणि चमारी अथापथू यांच्या यादीत तिचा समावेश झाला आहे.

महिलांच्या T20I सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार

१३४ - सोफी डिव्हाइन (न्यूझीलंड)

१३४+ - डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)

१२० - चमारी अथापथू (श्रीलंका)

१०० - स्मृती मानधना (भारत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news