EURO CUP 2024 : स्लोव्हेनियाची कडवी झुंज, पेनल्टीवर पोर्तुगालचा विजय

पेनल्टी शुटआऊटमध्ये पोर्तुगालची स्लोव्हेनियावर मात
Portugal beat Slovenia in penalty shoot out
युरो कपच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात नवख्या स्लोव्हेनियाने विजयासाठी पोर्तुगालला झुंजवले.Ronaldo against slovenia
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी (दि.2) पहाटे 3.30 पर्यंत रंगलेल्या युरो कपच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात नवख्या स्लोव्हेनियाने विजयासाठी पोर्तुगालला झुंजवले. पेनल्टी शुट आऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात गोलकीपर डियागो कोस्टाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पोर्तुगालने पेनल्टीवर 3-0 ने विजय मिळवत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला.

पहिल्या हाफच्या सुरूवातीला सामन्यावर पकड ठेवलेल्या पोर्तुगालचा संघ काही काळाने पिछाडीवर पडला. याचा फायदा घेत स्लोव्हेनियाने पोर्तुगालच्या गोलजाळीच्या दिशेने हल्ले चढवले. परंतु, पोर्तुगालचा अनुभवी बचावपटू पेपेच्या खेळीमुळे आणि फिनिशिंग अभावी गोल करण्याच्या संधीचा ते फायदा घेवू शकले नाही, सामन्यातील पहिला हाफ हल्ले-प्रतिहल्ले असा रंगला. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालने गोल करण्याच्या इराद्याने मैदानात खेळी केली. उत्कृष्ट पासिंग करत त्यांनी अनेक चढाया केल्या. परंतु, स्लोव्हेनियाच्या पाच खेळाडूंची बचावफळी बेदण्यात यश आले नाही. स्लोव्हेनियानेची पाच खेळाडूंची बचावफळी बेदण्यात यश आले नाही.

Portugal beat Slovenia in penalty shoot out
दिनेश कार्तिक IPL मध्ये परतला, 'या' नव्या भूमिकेत दिसणार

स्लोव्हेनियाची बचावफळी भेदण्यात पोर्तुगाल अयशस्वी

पोर्तुगालच्या खेळाडूंना आक्षेपार्ह अडवल्यामुळे रेफ्रींनी 4 फ्री किक बहाल केली. यामध्ये रोनाल्डोने सर्व फ्री किक घेतल्या. यामध्ये 3 टार्गेटवर तर 1 ऑफ टार्गेट होती. परंतु, या रोनाल्डोला या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पोर्तुगालसाठी गोल करण्यासाठी रोनाल्डो, ब्रुनो फर्नांडिस आणि डियागो जोटा यांनी गोल करण्यासाठी अनेक चढाया रचल्या. परंतु, गोल करण्यात त्यांना यश आले नाही. स्लोव्हेनियाने ही आपले आक्रमणे वाढवत गोल करण्याची संधी निर्माण केली. परंतु, त्यांना गोल करण्यात यश आले नाही.

Portugal beat Slovenia in penalty shoot out
IND vs SA : भारतीय महिला संघाने उडवला द. आफ्रिकेचा धुव्‍वा

निर्धारित वेळेत स्कोअर बरोबरीत

निर्धारित 90 मिनिटाच्या खेळात स्कोअर 0-0 असा बरोबरीत राहिल्याने रेफ्रींनी सामना एस्ट्रा टाईममध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटात रेफ्रींनी पोर्तुगालला पेनल्टी किक बहाल केली. या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यात रोनाल्डो अयशस्वी ठरला. रोनाल्डोची किक स्लोव्हेनियाचा गोलकीपर ओबलकने अडवला. तर, दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालचा अनुभवी बचावपटू पेपेच्या चुकीमुळे स्लोवाकिला गोल करण्याची सोपी संधी मिळाली. परंतु, पोर्तुगालचा गोलकीपर कोस्टाने उत्कृष्ट सेव्ह करत पोर्तुगालचा सामन्यात जिवंत ठेवले.

Portugal beat Slovenia in penalty shoot out
विश्वचषकाच्या विजयानंतर बार्बाडोसच्या वादळात अडकले भारतीय खेळाडू

पेनल्टी शुटआऊटमध्ये पोर्तुगाल विजयी

यानंतर पेनल्टी शुट आऊटमध्ये सामन्याचा निकाल लावण्याचा निकाल रेफ्रींनी घेतला. यामध्ये गोलकीपर डियागो कोस्टाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोर्तुगालने सामन्यात पेनल्टीवर 3-0 ने विजय मिळवला.

रोनाल्डोला अश्रू अनावर

यामध्ये एस्ट्रा टाईमच्या पहिल्या हाफमध्ये पोर्तुगालला रेफ्रींनी पेनल्टी किक बहाल केली. परंतु, या सुवर्ण संधीचा फायदा रोनाल्डोला घेता आला नाही. त्याने यावेळी गोल केला असता. तर, सामना पोर्तुगालच्या पक्षात फिरला असता. परंतु ही संधी हुकल्यामुळे रोनाल्डोसह पोर्तुगालच्या हजारो चाहत्यांना अश्रू अनावर झाले. यानंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये पहिला गोलची नोंद केल्यानंतर रोनाल्डोने चाहत्यांची माफी मागितली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news