IND vs SA : भारतीय महिला संघाने उडवला द. आफ्रिकेचा धुव्‍वा

कसाेटी सामन्‍यात 10 विकेट्स राखून दणदणीत विजय
India vs South Africa Test match
भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाचा 10 गडी राखून पराभव केला. Twitter
Published on
Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाचा 10 गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिला डाव 603/6 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 266 धावांवर आटोपला.

शेफाली वर्मा, स्मृती मंधानाची दमदार फलंदाजी

भारतासाठी पहिल्या डावात शेफाली वर्माने 197 चेंडूंचा सामना करत 23 चौकार आणि 8 षटकारांसह 205 धावा केल्या. त्यांच्याशिवाय स्मृती मानधना हिने १४९ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 69 धावा, यष्टीरक्षक रिचा घोषने 90 चेंडूत 86 धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 94 चेंडूत 55 धावा केल्या. शुभा सतीशने 15 धावा केल्या, तर दीप्ती शर्मा 2 धावा करून नाबाद राहिली.भारतीय संघाने पहिला डाव ६०३ धावांवर घोषित केला.

India vs South Africa Test match
T20 वर्ल्डकप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे लोकभेत अभिनंदन

स्नेहा राणाने घेतले 8 बळी

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 266 धावांत गारद झाला. मारिजन कॅपने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. त्यांच्याशिवाय सुने लुउसने 65 आणि नॅडिन डी क्लर्कने 39 धावा केल्या. स्नेहा राणाने भारताकडून 8 यश मिळवले. त्याच्याशिवाय दीप्ती शर्माने दोन बळी घेतले.

India vs South Africa Test match
T20 World Cup 2024|'विश्‍व'विजेत्‍या टीम इंडियाला संगीतकार रेहमान यांनी दिली खास भेट

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ३७३ धावांवरच आटोपला

दुसऱ्या डावात फॉलोऑनसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव 373 धावांत गारद झाला.कर्णधार लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक 122 धावा केल्या. त्याच्याशिवाय सुने लुसनेही शतक झळकावले. लुसने 203 चेंडूत 109 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय अन्‍य फलंदाज अपयशी ठरेले. भारताकडून स्नेहा राणा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच पूजा वस्त्राकर, शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. सलग दुसर्‍यांदा फलंदाजीला उतरलेल्‍या दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या डावात 373 धावा केल्या. संघाला केवळ 36 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात भारतासमोर 37 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाने हे लक्ष्य ९.२ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. शुभा सतीश 26 चेंडूत 13 धावा करून तर शेफाली वर्मा 30 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिल्या.

India vs South Africa Test match
T20 World Cup|T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद

भारताने वन-डे मालिका जिंकली, कसोटीतही बाजी आता T20 मालिका

दक्षिण आफ्रिका संघाला महिला भारतीय सघाने वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला होता. आता एकमेव कसोटी सामनाही जिंकला आहे. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 5 जुलै रोजी या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

India vs South Africa Test match

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news