Winter Olympics controversy | धक्‍कादायक..! स्‍की जंपिंग खेळाडूंना दिले चक्‍क शिश्नाला इंजेक्‍शन, लांब उडीसाठी अजब शक्कल

विंटर ऑलिम्पिकमध्ये 'पेनिसगेट'चे वादळ; 'वाडा' करणार सखोल चौकशी
Winter Olympics controversy
प्रातिनिधिक फोटो
Published on
Updated on

Winter Olympics controversy |

हे वाचायला आणि ऐकायला विचित्र वाटेल; पण स्‍की जंपिंग खेळाडूंनी दूर उडी मारण्यासाठी त्यांच्या शिश्नामध्ये हायल्यूरॉनिक ॲसिडचे इंजेक्शन घेत असल्‍याचे धक्‍कादायक वृत्त जर्मन वृत्तपत्र 'बिल्ड'ने सर्वप्रथम दिले आहे. याला 'पेनिसगेट' असे नावही देण्‍यात आले आहे. स्की जंपर्स अधिक दूर उडी मारण्यासाठी त्यांच्या शिश्नामध्ये हायल्यूरॉनिक ॲसिडचे इंजेक्शन घेत आहेत का, असा सवाल उपस्‍थित होत आहे. या विचित्र प्रकरणामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली असून जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था (वाडा) चे अध्यक्ष विटोल्ड बांका यांनी या प्रकरणाच्‍या चौकशीचे संकेत दिले आहेत.

काय आहे हे प्रकरण?

जर्मन वृत्तपत्र 'बिल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, स्की जंपिंगमध्ये खेळाडूंच्या कपड्यांचे (सूट) माप घेताना शरीराच्या सर्वात खालच्या भागापासून (जननेंद्रिय) ३डी स्कॅनरद्वारे मोजमाप केले जाते. नियमानुसार, खेळाडूचा सूट शरीराशी जेवढा घट्ट असेल, तेवढी हवेतील गती कमी होते. मात्र, जर हा सूट सैल असेल, तर तो विमानाच्या पंखांसारखा काम करतो, यामुळे खेळाडू हवेत जास्त काळ तरंगू शकतो आणि लांब उडी मारू शकतो. असा आरोप आहे की, माप घेताना आपले जननेंद्रिय तात्पुरते मोठे दिसण्यासाठी खेळाडू त्यात इंजेक्शन टोचून घेत आहेत किंवा अंतर्वस्त्रात क्ले (माती) भरत आहेत. यामुळे त्यांचे माप मोठे येते आणि प्रत्यक्ष स्पर्धेवेळी त्यांना सैल सूट मिळतो, ज्याचा फायदा त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी होतो.

Winter Olympics controversy
India Pakistan water dispute | सिंधू पाणी कराराला स्थगितीनंतर केंद्र आक्रमक; आता चिनाबवरील प्रकल्पाचे काम होणार युद्धपातळीवर

वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत जोखमीचे आणि धोकादायक

द गार्डियन'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, स्‍की जंपिंग खेळाडूंच्‍या सूटच्या आकारात केवळ २ सेमीची वाढ झाल्यास हवेचा रोध ४ टक्क्यांनी कमी होतो आणि ५.८ मीटरपर्यंत अतिरिक्त अंतर गाठता येते. वैद्यकीय तज्ज्ञांच्‍या मते "पॅराफिन किंवा हायलुरोनिक ॲसिडद्वारे जननेंद्रियाचा आकार तात्पुरता वाढवणे शक्य आहे, पण हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत जोखमीचे आणि धोकादायक आहे."

Winter Olympics controversy
T20 World Cup 2026 | भारत-पाकिस्‍तान 'क्रिकेट' वादात बांगलादेशची एन्ट्री; ICC विरुद्ध पाकिस्तान संघर्षाला नवे वळण!

बांका यांनी मिश्‍लिल टिप्‍पणी करत दिले चौकशीचे संकेत

या प्रकरणाला 'पेनिसगेट' असे नाव देण्यात आले आहे. 'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका यांनी मिश्किलपणे टिप्पणी करताना सांगितले की, "माझ्या पोलंडमध्ये स्की जंपिंग अत्यंत लोकप्रिय आहे, त्यामुळे मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन देतो."संस्थेचे महासंचालक ऑलिव्हियर निग्ली यांनी स्पष्ट केले की, "खेळाडूचे आरोग्य धोक्यात घालणारी आणि खिलाडूवृत्तीच्या विरोधात जाणारी कोणतीही पद्धत निषिद्ध आहे. जर हे प्रकार कामगिरी सुधारण्यासाठी (Doping) केले जात असतील, तर आमची समिती याची सखोल चौकशी करेल."

Winter Olympics controversy
T20 World Cup PAK vs NED | पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्‍तान थोडक्‍यात बचावला, नेदरलँडविरुद्‍ध निसटता विजय!

सूटच्या शिवणीमध्ये बदल, नॉर्वेचे दोन ऑलिम्पिक पदक विजेते निलंबित

गेल्या वर्षी नॉर्वेच्या दोन ऑलिम्पिक पदक विजेत्यांना, मारियस लिंडविक आणि जोहान आंद्रे फोरफँग यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते, कारण २०२५ च्या जागतिक स्की चॅम्पियनशिपमध्ये संघाने त्यांच्या सूटच्या जांघेच्या भागातील शिवणांमध्ये गुप्तपणे बदल केल्याचे आढळले होते. नॉर्वेचे मुख्य प्रशिक्षक मॅग्नस ब्रेविक, सहाय्यक प्रशिक्षक थॉमस लॉबेन आणि कर्मचारी सदस्य एड्रियन लिव्हलटेन यांच्यावरही १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली. या बदलांमुळे जंपर्सचे सूट मोठे झाले आणि वाढलेल्या पंखांच्या विस्तारामुळे त्यांचा खाली येण्याचा वेग कमी झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news