T20 World Cup PAK vs NED | पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्‍तान थोडक्‍यात बचावला, नेदरलँडविरुद्‍ध निसटता विजय!

फहीम अशरफचा सुटलेला झेल नेदरलँडला पडला महागात
T20 World Cup  PAK vs NED | पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्‍तान थोडक्‍यात बचावला,  नेदरलँडविरुद्‍ध निसटता विजय!
Published on
Updated on

T20 World Cup PAK vs NED

कोलंबो : टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात आज (दि. ७) पाकिस्तान संघ थोडक्‍यात बचावला. पराभवाचे पराभवाच्या छायेत असलेल्या पाकिस्तानला १९ व्या ओव्हरने सावरले आणि संभाव्य उलटफेर टळला. १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था १८ व्या षटकापर्यंत ७ बाद ११९ अशी बिकट झाली होती, मात्र अखेरच्या क्षणी यश मिळाले अन्‍यथा पहिल्‍याच सामन्‍यात संघात पराभवाला सामोर जावे लागले असते.

नेदरलँडची १४७ धावांपर्यंत मजल

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडचा संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला. एकेकाळी त्यांची स्थिती ३ बाद १०५ अशी भक्कम होती, मात्र पुढच्या ४२ धावांत त्यांनी उरलेले ७ गडी गमावले.मॅक्स ओडॉड (५) स्वस्तात बाद झाला.मायकल लेविट (२४) याला बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीच्या उत्कृष्ट ताळमेळाने सीमारेषेवर झेलबाद केले.कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक ३७ धावा (२९ चेंडू) केल्या. पाकिस्तानकडून सलमान मिर्झा आणि अबरार अहमद यांनी भेदक गोलंदाजी करत नेदरलँडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

T20 World Cup  PAK vs NED | पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्‍तान थोडक्‍यात बचावला,  नेदरलँडविरुद्‍ध निसटता विजय!
T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा धक्का! हर्षित राणानंतर जसप्रीत बुमराही संघाच्या बाहेर; काय आहे कारण?

पाकिस्‍तान होता पराभवचाच्‍या छायेत

विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली. सॅम अयुब (२४) आणि कर्णधार सलमान आगा (१२ धावांवर तंबूत परतले. फरहानने ३१ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची महत्त्वाची खेळी केली. पाठोपाठ उस्मान खान (०), बाबर आझम (१५), मोहम्मद नवाज (६) आणि शादाब खान (८) बाद झाल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता.

T20 World Cup  PAK vs NED | पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्‍तान थोडक्‍यात बचावला,  नेदरलँडविरुद्‍ध निसटता विजय!
T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया अडचणीत, स्पर्धेपूर्वीच संघाला मोठा झटका; ‘स्टार गोलंदाज’ स्पर्धेतून बाहेर

१८ व्या षटकापर्यंत नेदरलँडचे पारडे होते जड

१८ व्या षटकापर्यंत नेदरलँडचे पारडे जड होते, मात्र फहीम अशरफला मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत पाकिस्तानने १९ व्या षटकात सामना खिशात घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news