

Shubman Gill Injury: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल सामन्याला मुकणार आहे. बीसीसीआयने सांगितलं की शुबमन गिलला गुरूवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार ही जखम सराव करताना झाली. खबरदारी म्हणून शुभमन गिल हा SLC XI विरूद्धच्या तीन दिवसांच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयची वैद्यकीय टीम ही शुभमन गिलच्या दुखापतीवर नजर ठेवून आहे. अजूनपर्यंत त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत काही माहिती सांगण्यात आलेली नाही.
गिलच्या अनुपस्थितीत भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल हा भारताचे नेतृत्व करणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारतासाठी हा सराव सामना अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या सामन्यातच टीम इंडिया किती पाण्यात आहे हे सिद्ध होईल.
कोलंबोच्या नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर हा सराव सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना आजपासून सुरू होत असून SLC XI ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ७ ऑगस्टपासून ९ ऑगस्टपर्यंत खेळवला जाणार आहे.
शुभमन गिलच्या दुखापतीमुळं टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. तो संघाचा कर्णधार असल्यानं अजूनच चिंता वाढली आहे. बीसीसीआयने गिलच्या बाबतीत सावध भूमिका घेत त्याच्या रिकव्हरीकडे लक्ष केंद्रित केलं आहे. आता गिल पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी फिट होता का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.