Sachin Tendulkar Shubman Gill: सचिन, अंजली अन् शुभमन गिल एकाच फ्रेममध्ये... विम्बल्डनची सर्वात ग्लॅमरस फोटो होतोय व्हायरल

Sachin Tendulkar Shubman Gill
Sachin Tendulkar Shubman Gillpudhari
Published on
Updated on

Sachin Tendulkar Shubman Gill: विम्बल्डनचा हंगाम सुरू झाला असून विम्बल्डनच्या रॉयल स्टँडमध्ये आजी माजी क्रिकेटपटूंचे येणे जाणे वाढले आहे. शुक्रवारी अशाच एका फोटोनं जगभरातील विशेष करून भारतातील क्रिकेट चाहत्यांना विम्बल्डनच्या कोर्टची दखल घेण्यास भाग पाडलं.

भारताचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलुकर हा न चुकता दर विम्बल्डनला हजेरी लावतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिलने देखील विम्बल्डनच्या स्टँडमध्ये हजेरी लावली. यावेळी तो सारा तेंडुलकरची आई अंजली आणि वडील सचिन तेंडुलकर यांच्या सोबत बसला होता.

Sachin Tendulkar Shubman Gill
Shubman Gill Century : शुभमन गिलचा 'कॅप्टन इनिंग' धमाका! अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या ७७ चेंडूंत ठोकले शतक

विशेष म्हणजे शुभमन गिलने पहिल्यांदाच ऑल इंग्लंड क्लबवरील विम्बल्डनच्या कोर्टवर हजेरी लावली होती. ही सीट क्रीडा विश्वातील सर्वात एक्सक्लुजीव सीट असते.

शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरने सेंटर कोर्टवरील झ्वरेव्हचा सामना पाहिला. त्याने फेरीचा पराभव करत विम्बल्डनची फायनल पहिल्यांदाच गाठली. फेरीने देखील चांगली झुंज दिली होती.

सचिनसोबतच ब्रायन लारा देखील हा सामना पाहण्यासाठी आला होता. तो शुबमन गिल, अंजली तेंडलुकर आणि सचिन तेंडलुकर यांच्या मागच्या सीटवर बसला होता.

Sachin Tendulkar Shubman Gill
Shubman Gill: शुभमन गिलने आधी पकडला सीझनचा सर्वात भयंकर कॅच! नंतर थेट चेन्नईच्या चाहत्यांनाच डिवचलं; पाहा व्हिडिओ

विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये विविध खेळातील स्टार खेळाडू, सेलिब्रेटी हे बसत असतात. या स्टँडमध्ये शुभमन गिल पहिल्यांदाच बसला होता. शुभमन गिल हा भारताचा वनडे कर्णधार असून इंग्लंडसोबत भारताची तीन सामन्यांची मालिका सुरू होत आहे. तत्पूर्वी ब्रेकमध्ये गिल विम्बल्डनच्या रॉयल स्टँडमध्ये दिसला होता.

भारतीय क्रिकेटपटूंव्यतिरिक्त लिव्हरपूलचा कर्णधार विर्गिल वॅन डिजक, लीड्स युनायटेड चेअरमन पराग मराठे यांनी देखील रॉयल स्टँडमधून सेंटर कोर्टवरचा सामना पाहिला होता.

Sachin Tendulkar Shubman Gill
Shubman Gill Sanju Samson Controversy: संजूला केलं गायब.. शुभम गिलच्या टी २० वर्ल्डकपच्या 'त्या' फोटोवरून वाद, काय आहे सत्य?

तीन सामन्यांची मालिका

भारताचा २५ वर्षाचा कर्णधार शुबमन गिल इंग्लंडविरूद्धच्या आगामी तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. ही मालिका १४ जुलैपासून सुरू होणार असून दुसरा सामना हा १६ जुलै तर तिसरा आणि शेवटचा सामना हा १९ जुलै रोजी होणार आहे.

शुभमन गिल भारताच्या टी २० संघात नाहीये. त्याला २०२६ मध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपपूर्वी संघातून वगळण्यात आले होते. त्यापूर्वी तो टी २० संघाचा उपकर्णधार होता. भारताचा टी २० संघ देखील इंग्लंडविरूद्ध टी २० मालिका खेळत आहे. मात्र भारताला मालिकेतील एकही सामना जिंकता आलेला नाही. आता गिलच्या नेतृत्वाखालील वनडे संघ तरी भारताची लाज वाचवतो का हे पहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news