Shubman Gill big Record : विराट-रोहितलाही जे जमले नाही ते गिल करून दाखवणार! महाविक्रमापासून अवघ्या १५७ धावा दूर

IND vs SL Test : 'असा' पराक्रम करणारा ठरणार पहिलाच भारतीय फलंदाज
Shubman Gill India vs Sri Lanka Test Series WTC Record
Published on
Updated on

Shubman Gill India vs Sri Lanka Test Series WTC Record

मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) पहिला हंगाम २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळवला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत तीन हंगाम यशस्वीरीत्या पार पडले असून सध्या चौथा हंगाम सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात जागतिक दर्जाच्या अनेक फलंदाजांनी आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. यातील काही फलंदाजांनी तर WTC च्या मंचावर धावांचा डोंगर उभारला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकल्यास, त्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि कसोटी कर्णधार जो रूट हा WTC मध्ये ६ हजारहून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. विशेष म्हणजे, रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत ५००० धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही.

Shubman Gill India vs Sri Lanka Test Series WTC Record
IND vs SL : अवघे २ बळी आणि मोठा पराक्रम! श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरताच जडेजा रचणार इतिहास, चक्क वीरेंद्र सेहवागला टाकणार मागे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही, ही बाब थक्क करणारी आहे. मात्र, आता या एलिट क्लबमध्ये स्थान मिळवण्याच्या अगदी उंबरठ्यावर भारतीय कर्णधार शुभमन गिल येऊन पोहोचला आहे.

३००० धावांचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी

शुभमन गिल हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. गिलच्या नावावर WTC च्या ४० कसोटी सामन्यांमधील ७३ डावांमध्ये ४३.०७ च्या सरासरीने २८४३ धावा नोंदवलेल्या आहेत. आगामी श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जर गिलने १५७ धावा करण्यात यश मिळवले, तर तो WTC च्या इतिहासात ३००० धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरेल. एवढेच नव्हे तर, अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकत तो WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीतही प्रवेश करेल. सध्या तो या यादीत १३ व्या स्थानावर आहे.

Shubman Gill India vs Sri Lanka Test Series WTC Record
Auqib Nabi : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात बुमराहच्‍या जागी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला संधी

WTC च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

  • शुभमन गिल: २८४३ धावा

  • ऋषभ पंत: २७८० धावा

  • रोहित शर्मा: २७१६ धावा

  • विराट कोहली: २६१७ धावा

  • रवींद्र जडेजा: २६१० धावा

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १५७ धावा फटकावताच शुभमन गिल केवळ WTC मध्येच नव्हे, तर एकंदरीत कसोटी क्रिकेटमध्येही आपल्या ३००० धावा पूर्ण करेल. असा टप्पा गाठणारा तो कसोटी क्रिकेटमधील २८ वा भारतीय फलंदाज ठरेल. गिल पहिल्यांदाच श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक धावांचा डोंगर उभारण्यासोबतच भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व करण्याचे दुहेरी आव्हान त्याच्या खांद्यावर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news