Shubman Gill: माझ्या आयुष्यात मी जिथं पाहिजे तिथं.... टी २० वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर गिल पहिल्यांदाच बोलला

Shubman Gill On T20 World Cup 2026 Selection Controversy: उपकर्णधारपदावरून गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
Shubman Gill
Shubman Gillpudhari photo
Published on
Updated on

Shubman Gill On T20 World Cup 2026 Snub: भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल एकेकाळी टी २० संघाचा उपकर्णधार होता. सूर्यकुमार यादवनंतर आता गिल टी२० संघासह तीनही फॉरमॅटचा कर्णधार होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतात अवघ्या काही महिन्यात सुरू होणाऱ्या टी २० वर्ल्डकपचा भारतीय संघ जाहीर झाला अन् शुभमन गिलसह सर्वांनाच एक मोठा धक्का बसला.

Shubman Gill
IND vs NZ | न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिल, श्रेयस अय्यरचे पुनरागमन

१५ सदस्यांच्या संघात उपकर्णधार शुभमन गिललाच डच्चू देण्यात आला होता. उपकर्णधारपदावरून गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळं निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या टीम सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले. संघ जाहीर झाला त्यावेळी गिल काही बोलला नव्हता.

Shubman Gill
Virat Kohli: विराट कोहलीने अर्शदीपची केली हुबेहूब नक्कल, रोहित शर्मालाही हसू आवरेना; पाहा Viral Video

मात्र आता न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेपूर्वी कर्णधार म्हणून प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेल्यावर त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने टी २० संघातून वगळ्याबद्दल त्याची काय भावना अन् मत आहे याबाबत वक्तव्य केलं.

Shubman Gill
Ruturaj Gaikwad Records: विराट-बाबर सोडा... आजपर्यंत कोणालाही जमला नाही असा विक्रम ऋतुराजनं करून दाखवलाय

शुभमन गिल म्हणाला, 'सर्वात पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात जिथं असयाल हवा होतो तिथं आहे. जे काही माझ्या नशिबात लिहिलं असेल ते मला मिळेल. एक खेळाडू म्हणून मला संघाला विजय मिळवून द्यायचा आहे.'

Shubman Gill
MCA Election Suspension: एमसीए निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती; रोहित पवारच्या घराणेशाहीवर न्यायालयाचा चाप

शुभमन गिलने निवडसमिती बाबत देखील आपलं मत मांडलं. त्यानं कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करत निवडसमितीचा निर्णय मान्य केला. तो म्हणाला, मी निवडसमितीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो. मी टी २० संघाला शुभेच्छा देतो. मला आशा आहे के वर्ल्डकप जिंकतील.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news