Cristiano Ronaldo : पोर्तुगालची वर्ल्डकपमधून 'एक्झिट' आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!

कोणत्याही खेळाडूने एकाच विश्वचषकात केलेली ठरली सर्वात निराशाजनक कामगिरी
Cristiano Ronaldo Unwanted Record
Cristiano Ronaldo Unwanted Record Pudhari
Published on
Updated on

Cristiano Ronaldo Unwanted Record : 'फिफा' २०२६ विश्वचषक स्पर्धेत जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीकडे वेधले होते. स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत (Round of 16) स्पेनविरुद्ध पोर्तुगालला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत संघाचे आव्हान संपुष्टात आलेच, त्याचबरोबर या रोनाल्डोच्या नावावर एका नकोशा वाटणाऱ्या विक्रमाचीही नोंद झाली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर ‘नकोशा’ विक्रमाची नोंद!

विश्वचषकाच्या इतिहासात सहकाऱ्यासाठी एकही गोलची संधी निर्माण न करता, सर्वाधिक शॉट्स मारणारा खेळाडू असा विक्रम आता रोनाल्डोच्या नावावर नोंदवला गेला आहे. ही आकडेवारी एकाच वेळी ख्रिस्तियानो रोनाल्डोबद्दल बरेच काही सांगून जाते आणि कदाचित काहीच सांगत नाही.

Cristiano Ronaldo Unwanted Record
VIDEO : सामना पोर्तुगालचा; घोषणा मेस्‍सीच्‍या! रोनाल्‍डोच्‍या निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात नेमकं काय घडलं?

सहकाऱ्यासाठी गोल करण्याची एकही संधी निर्माण करू शकला नाही

रोनाल्डोने २०२६ च्या विश्वचषकात एकूण १७ वेळा गोल करण्याचा प्रयत्न (Shots) केला, परंतु संपूर्ण स्पर्धेत आपल्या पोर्तुगालच्या एकाही सहकाऱ्यासाठी गोल करण्याची एकही संधी तो निर्माण करू शकला नाही.

Cristiano Ronaldo Unwanted Record
Cristiano Ronaldo Retirement: 2026 फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो निवृत्त होणार? बहिणीच्या एका वक्तव्याने फुटबॉल विश्वात खळबळ

फुटबॉल विश्वचषकातील सर्वात 'निराशाजनक' कामगिरी

१९६६ मध्ये अधिकृत आकडेवारी नोंदवण्यास सुरुवात झाल्यापासून, कोणत्याही खेळाडूने एकाच विश्वचषकात केलेली ही अशा प्रकारची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे. याआधी हा नकोसा विक्रम मेक्सिकोच्या अल्बर्टो गार्शिया आस्पेच्या नावावर होता, ज्याने १९९८ च्या फ्रान्स विश्वचषकात सहकाऱ्याला एकही संधी न देता १५ शॉट्स मारले होते. याशिवाय, १९७४ मध्ये पोलंडच्या जर्झी गोर्गोनने १३, २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कॅटलेगो म्फेलाने १३, आणि २०१८ मध्ये रशियाच्या डेनिस चेरिशेव्हनेही १३ शॉट्स मारले होते. रोनाल्डोने आता या सर्वांना मागे टाकत दोन शॉट्स जास्त मारले आहेत.

Cristiano Ronaldo Unwanted Record
Lionel Messi World Cup Record: टायगर इज बॅक! लिओनेल मेस्सीची हॅट्ट्रिक... रोनाल्डोच्या खास रेकॉर्डची देखील केली बरोबरी

आकडेवारी नेमकं काय सांगते?

या आकडेवारीकडे दोन दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. एका बाजूला चार सामन्यांत १७ शॉट्स मारणे हे दाखवते की, रोनाल्डो याने प्रत्येक सामन्यात गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याचा स्वतःवरील विश्वास कमी झाला नाही आणि तो सातत्याने चेंडू मागवून गोल करण्याचा प्रयत्न करत राहिला; पण दुसरीकडे त्याच चार सामन्यांमध्ये शून्य संधी निर्माण करणे, एकही की-पास किंवा असिस्ट (Assist) न देणे हे रोनाल्डो आता पोर्तुगालच्या आक्रमणातील मध्यवर्ती शक्ती राहिला नसल्याचे स्पष्ट करते. या १७ शॉट्समधून स्पर्धेत त्याने आपल्या नावावर तीन गोल नोंदवले. त्याची गोल करण्याची क्षमता त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली. मात्र संघातील सहकाऱ्यांसाठी संधी निर्माण न करण्याच्या आकडेवारीने दुसरीच बाजू समोर आणली.

Cristiano Ronaldo Unwanted Record
FIFA World Cup Black Magic: घानाने केली इंग्लंडच्या कर्णधारावर काळी जादू...? हॅरीने गोलची सोपी संधी दवडली अन् सामना बरोबरीत

प्रशिक्षकांनी केली रोनाल्डोची पाठराखण

पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी संपूर्ण स्पर्धेत रोनाल्डोची पाठराखण केली. आकडेवारी काहीही सांगत असली, तरी "रोनाल्डो मैदानात असल्यामुळे प्रतिस्पर्धी बचावपटू त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे इतर खेळाडूंना मोकळी जागा मिळते," असा दावा मार्टिनेझ यांनी केला. त्याच्या सहकाऱ्यांनीही जाहीरपणे प्रत्येक वळणावर त्याला पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news