Lionel Messi World Cup Record: टायगर इज बॅक! लिओनेल मेस्सीची हॅट्ट्रिक... रोनाल्डोच्या खास रेकॉर्डची देखील केली बरोबरी

Lionel Messi World Cup Record
Lionel Messi World Cup Recordpudhari
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 Lionel Messi: ज्या सामन्याची अर्धे जग वाट पाहत होतं तो सामना अखेर अमेरिकेतील कन्सास सिटी स्टेडियममध्ये झाला. अर्जेंटिनाचा स्टार कर्णधार लिओनेल मेस्सी हा पहिला सामना खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. त्याच्या पाठीला दुखापत झाल्यामुळं तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात होते.

Lionel Messi World Cup Record
FIFA World Cup Gilberto Mora: कोण आहे हा गिलबर्टो मोरा? १७ वर्षीय फुटबॉलपटूने फिफा विश्वचषकात ९६ वर्षांचा विक्रम मोडला!

मात्र मेस्सी मैदानात उतरला आणि वर्ल्डकपचा टायगर पुन्हा आलाय हे डरकाळी फोडून सांगितलं. तिकडं एम्बाप्पे हॅट्ट्रिक करत असताना अर्जेंटिनाचा मेस्सी कुठं मागे रहातोय.... त्यानं देखील अल्जेरियाविरूद्धच्या आपल्या सलामीच्या सामन्यातच ३ गोल करत धमाका केला.

लिओनेल मेस्सीने १७ व्या मिनिटाला पहिला गोल करत यंदाच्या वर्ल्डकपमधील आपलं खातं उघडलं. त्यानंतर त्याने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोलं करत अर्जेंटिनाला ३-० असा विजय मिळवून दिला.

Lionel Messi World Cup Record
FIFA World Cup 2026 : मेस्सी है तो मुमकिन है..! ३९ वर्षीय लिओनेल मेस्सीचा मैदानात उतरताच गोल!

याचबरोबर मेस्सीने अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली आहे. मेस्सी आता पुरूषांच्या फुटबॉल वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याचबरोबर पाच वेगवेगळ्या वर्ल्डकपमध्ये गोल करणारा मेस्सी आता क्रिस्तियानो रोनाल्डोबरोबरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

आठवेळा बालॉन डओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी आता सहा वर्ल्डकप खेळणारा पहिला खेळाडू देखील ठरला आहे. या विक्रमाची बरोबरी मेस्सीचा कट्टर प्रतिस्पर्धी रोनाल्डो याच वर्ल्डकपमध्ये करणार आहे. तो जर कांगो सोबतच्या गुरूवारच्या सामन्यात खेळला तर तो या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.

Lionel Messi World Cup Record
FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वचषकात सर्वात जलद गोल आहे कोणाच्या नावावर...? जाणून घ्या ५ भन्नाट गोष्टी

मेस्सीने अजून एक माईलस्टोन पार केला आहे. तो आता फुटबॉल इतिहासातला त्याच्या देशाकडून २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रोनाल्डोने २२८, बदर अल मुतावा २०२ त्यानंतर लिओनेल मेस्सी २०० आपल्या देशाकडून २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news